Latest

अर्थज्ञान : शेअरच्या कमाईवर कर भरावा लागतोय?

अमृता चौगुले

तज्ज्ञांच्या मते, एखाद्या गुंतवणूकदाराला भांडवली नफा झाला असेल आणि त्यावर कर भरावा लागत असेल, तर मेथडचा वापर करून काही प्रमाणात कर कमी करू शकतो. ही पद्धत कर वाचवण्यासाठी उपयुक्त आहेे. त्याचा लाभ कसा उचलता येईल, हे पाहू.

समजा, एका आर्थिक वर्षाच्या काळात एका ट्रेडरला अनेक व्यवहारातून बराच फायदा झाला असेल, तर वर्षाच्या शेवटी या नफ्यावर लाँग टर्म किंवा शॉर्ट टर्म टॅक्स भरावा लागतो. याठिकाणी भांडवली नफ्यावरचा कर कमी करण्यासाठी टॅक्स लॉस हार्वेस्टिंग मेथडचा वापर करता येऊ शकतोे. यासाठी ट्रेडरला ज्या शेअरमध्ये नुकसान झाले आहे, ते तोट्यात विक्री करू शकतो आणि अन्य शेअरवर झालेल्या फायद्याला अ‍ॅडजेस्ट करू शकतो. यानुसार तो कॅपिटल गेन टॅक्स कमी करू शकतो.

थोडक्यात, टॅक्स-लॉस हार्वेस्टिंगसाठी आपल्याला आपल्या काही समभागांची अथवा फंड युनिटची तोट्यात विक्री करावी लागेल.
1 एप्रिल 2018 पासून एक लाखांपेक्षा अधिक लाँग टॅम कॅपिटल गेन्सवर विना इंडेसेक्शन 10 टक्के कर आकारला जातो. या तुलनेत शॉर्ट टर्म कॅपिटल गेन्सवर 15 टक्के दराने कर आकारला जातो.

यानुसार एखाद्या गुंतवणूकदाराला चालू आर्थिक वर्षातच एक लाख रुपयाचा शॉर्ट टर्म कॅपिटल गेन झाला असेल, तर त्याला 15 हजार रुपये कर भरावा लागेल. तोच गुंतवणूकदार 60 हजार रुपयांचे नुकसानीतील स्टॉक सोबत ठेवत असेल आणि त्याची विक्री करत असेल, तर शॉर्ट टर्म कॅपिटल गेन 40 हजार रुपयांपर्यंत येईल. परिणामी, गुंतवणूकदाराला केवळ 6 हजार रुपये कर भरावा लागेल. तो कर 40 हजारांवर 15 टक्के दराने आकारला गेलेला आहे. या पद्धतीने गुंतवणूकदाराला तोटा कमी करण्यास आणि 9 हजारांचा कर वाचवण्यास मदत मिळते.

टॅक्स लॉस हार्वेस्टिंगचे फायदे

तोट्यातील स्टॉक विक्रीतून मिळालेेल्या रकमेचा वापर आकर्षक स्टॉक किंवा इक्विटी फंड खरेदी करण्यासाठी केला जाऊ शकतो. पोर्टफोलिओचे मूळ असेट अलोकेशन ठेवण्यासाठी ही बाब आवश्यक आहे. टॅक्स लॉस हार्वेस्टिंग कर वाचण्यासाठी महत्त्वाचे साधन आहे. याशिवाय आपल्या पोर्टफोलिओत डायव्हर्सिफिकेशन आणण्यासाठी ही पद्धत मदत करते. ही पद्धत नुकसान कमी करत नाही; परंतु कर वाचवण्यासाठी नक्कीच फायदेशीर ठरते. टॅक्स लॉस हार्वेस्टिंग मेथडचा वापर करताना प्राप्तिकर नियमांचे पालन करणे गरजेचे आहे. नुकसानीची भरपाई करताना काही गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजेत. लाँग टर्म कॅपिटल लॉसला केवळ लाँग टर्म कॅपिटल गेनविरुद्धच सेट ऑफ करता येऊ शकते. लाँग टर्म कॅपिटल लॉसला शॉर्ट टर्म कॅपिटल गेनबरोबर सेट ऑफ करू शकत नाही. शॉर्ट टर्म कॅपिटल लॉसला शॉट टर्म कॅपिटल गेन किंवा लाँग टर्म कॅपिटल गेनविरुद्धच सेट ऑफ करता येऊ शकते.

एखादा गुंतवणूकदार स्टॉक किंवा म्युच्युअल फंडमधील गुंतवणूक दोन कारणाने विकतो. एकतर त्याला कॅपिटल गेन (भांडवली नफा) होत असतो किंवा लॉस (भांडवली नुकसान) सहन करावा लागत असतो. भांडवली नफ्यावर कर आकारला जातो आणि हा कर गुंतवणुकीच्या होल्डिंग पीरियडवर अवलंबून असतो.

प्रसाद पाटील

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT