Latest

कोल्हापूर: कणेरी मठातील पर्यावरणपूरक उपक्रम कौतुकास्पद: एकनाथ शिंदे

अविनाश सुतार

पुढारी ऑनलाईन डेस्क : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज (दि. ११) कोल्हापूर दौऱ्यावर आले आहेत. दरम्यान मुख्यमंत्र्यांनी कणेरी मठ येथे २० ते २६ फेब्रुवारी या कालावधीत होणाऱ्या पंचमहाभूत लोकोत्सवाच्या तयारीची पाहणी केली. हा लोकोत्सव ७ दिवस चालणार आहे. येथील विविध उपक्रमांची माहिती घेतल्यानंतर त्यांनी कौतुक केले. यावेळी काडसिद्धेश्वर महाराज उपस्थित होते.

मुख्यमंत्री शिंदे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, कणेरी मठातील सर्व उपक्रम आदर्शवत असे आहेत. येथे आदर्श गावाची संकल्पना मांडण्यात आली आहे. पर्यावरणपूरक उपक्रम राबविणाऱ्यावर भर देण्यात आला आहे. त्यामुळे पर्यावरणाचे संवर्धन होण्यास मदत होणार आहे. शेतकऱ्यांच्या सहभागातून कलस्टर शेती केली जाणार आहे. सेंद्रीय खते वापरून पिके घेतली जाणार आहेत. त्यामुळे विषमुक्त शेतीला प्रोत्साहन मिळण्यास मदत होणार आहे. जैविक शेतीतून उत्पन्न कमी मिळते, हा गैरसमज येथे दूर केला आहे. या शेतीतून उत्पन्नही मोठे मिळते, व फायदाही मिळतो. येथे देशी गायीची गोशाळा आहे. गायींच्या शेण, मुत्रापासून विविध उत्पादने घेतली जात आहेत. शेणापासून पेंटही तयार केला जात आहे.
गावातील लोकांना आवश्यक वस्तुंचे उत्पादन येथेच घेतले जाणार आहे. येथील लोकांची गरज भागवून त्याची विक्री केली जाणार आहे.

हेही वाचा 

SCROLL FOR NEXT