Latest

काजू खाल्ल्याने आरोग्यास होतात अनेक लाभ

Arun Patil

नवी दिल्ली : आरोग्य चांगले राहण्यासाठी सुका मेवा खाणे लाभदायक ठरत असते. त्यामध्येही काजू खाण्याचे अनेक फायदे असतात, असे आहारतज्ज्ञांनी म्हटले आहे. काजूच्या सेवनाचे विविध लाभ असे…

रोज काजू खाल्ल्याने हाडे, केस, त्वचा, मधुमेह आणि वजन नियंत्रित राहण्यास मदत होते. काजूत प्रोटिन , व्हिटामिन बी, सी, के, आयर्न प्रमाण जास्त असतं. काजू खाल्ल्याने स्मरणशक्ती आणि एकाग्रता वाढते. नैराश्यावर काजू खाल्ल्याने चांगला फायदा होतो. यामुळे मेंदूतील सिरोटोनिनचं प्रमाण वाढतं, मानसिक स्थिती सुधारते. काजू खाल्ल्याने रक्ताभिसरण सुरळीत होतं आणि रक्तदाब नियंत्रणात राहण्यास मदत होते.

काजूतील पोषकतत्त्वांमुळे पेशीच्या डीएनएचं रक्षणं होत, पेशी निरोगी राहतात. काजू शारीरिक आणि मानसिक आरोग्य उत्तम ठेवण्यासाठी फायदेशीर आहे. काजू खाल्ल्याने हाडे मजबूत होतात. काजूमध्ये कॅल्शियम आणि मॅग्नेशियम आढळते, जे हाडांच्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे. काजू खाल्ल्याने शरीरातील ग्लुकोजची पातळी नियंत्रणात राहते. त्यामुळे मधुमेहाच्या रुग्णांसाठीही काजू फायदेशीर ठरतात.

SCROLL FOR NEXT