Latest

रोज 2 सफरचंदे खाल्ल्याने घातक कॉलेस्ट्रॉल होते कमी

Arun Patil

लंडन, वृत्तसंस्था : दररोज दोन सफरचंद खाल्ल्याने रक्तातील वाढत्या कॉलेस्ट्रॉलचे प्रमाण अपेक्षितरीत्या कमी होते, असा निष्कर्ष ब्रिटनमधील एका संशोधनातून काढण्यात आला आहे. ब्रिटनमध्ये युनिव्हर्सिटी ऑफ रीडिंगतर्फे नुकत्याच झालेल्या या संशोधनानुसार दररोज 2 सफरचंद खाल्ल्याने वाईट कॉलेस्ट्रॉल 40 टक्क्यांनी कमी होतात, असे आढळून आले आहे.

अनेक जणांसाठी वाढते कॉलेस्ट्रॉल ही मोठी समस्या आहे. कॉलेस्ट्रॉल खरेतर शरीरासाठी एक आवश्यक घटक आहे. पेशी आणि संप्रेरकांच्या निर्मितीला कॉलेस्ट्रॉलची मोठी मदत होते. कॉलेस्ट्रॉल 2 प्रकारचे असतात, एक एलडीएल आणि दुसरे एचडीएल. एलडीएल हे वाईट, तर एचडीएल हे उत्तम म्हणून ओळखले जातात. एलडीएलमध्ये वाढ होऊन ते रक्तवाहिन्यांत जमा होऊ लागते, तेव्हा हृदयविकाराचा धोका वाढतो.

सफरचंदाचे हेही फायदे

हृदयविकाराचा झटका, पक्षाघाताचा धोका कमी होतो. धमन्यांना आराम मिळतो, रक्तप्रवाह चांगला होतो.

हेही लक्षात ठेवा

दररोज किमान 30 मिनिटे व्यायाम केला पाहिजे. मांसाहाराचे प्रमाण कमीत कमी ठेवायला हवे.

अ‍ॅपल अँड फॅटी अ‍ॅसिड

सफरचंदात पॉलिफेनॉल आणि फायबर भरपूर प्रमाणात असते. ते शरीरात फॅटी अ‍ॅसिड तयार करते. त्यामुळे यकृतातील कोलॅस्ट्रॉलची निर्मिती नियंत्रित राहाते.
शरीरातील एकूण कॉलेस्ट्रॉलची सामान्य पातळी 200 एमजी/डीएल पेक्षा कमी असते.
एलडीएल अर्थात वाईट कॉलेस्ट्रॉल 100 एमजी/डीएल पेक्षा कमी आणि एचडीएल अर्थात उत्तम कॉलेस्ट्रॉल 60 एमजी/डीएल पेक्षा जास्त असायला हवेत.

SCROLL FOR NEXT