Latest

Earthquake in Jammu & Kashmir: जम्मू काश्मीरमधील किश्तवारमध्ये सौम्य भूकंपाचे धक्के

मोनिका क्षीरसागर

पुढारी ऑनलाईन डेस्क: गेल्या दोन दिवसांपासून जम्मू काश्मीरमध्ये सतत भूकंपाचे धक्के जाणवत आहेत. आज (दि.६) दुपारी २ वाजून ५३ मिनिटांनी भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. या भूकंपाची तीव्रता ३.८ रिश्टर इतकी होती, अशी माहिती राष्ट्रीय भूकंपविज्ञान केंद्राने दिल्याचे वृत्त एएनआयने दिले आहे. (Earthquake in Jammu & Kashmir)

यापूर्वी गेल्या २४ तासाहून अधिक कालावधीत जम्मू-काश्मीरच्या केंद्रशासित प्रदेशातील किश्तवाड आणि डोडा जिल्ह्यात भूकंप झाला. या भूकंपाची तीव्रता३.२ ते २.६दरम्यान रिश्टर स्केलवर नोंदवण्यात आली आहे. यामध्ये कोणतेही नुकसान झाल्याची माहिती नाही, असेही स्थानिक माध्यमांनी दिलेल्या माहितीत स्पष्ट केले आहे. (Earthquake in Jammu & Kashmir)

नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजीनुसार, जम्मू काश्मीरमधील किश्तवारमध्ये पाच तर डोडामध्ये एक भूकंप झाला. शुक्रवारी (दि.५) रात्री 11 वाजेपर्यंत एकूण सहा धक्के बसले होते. गुरुवारी (दि.४) पहाटे 5 वाजून 20 मिनिटांनी किश्तवारमध्ये ३.८ रिश्टर स्केल, सकाळी ६ वाजून ५६ मिनिटांनी २.९ रिश्टर, दुपारी २ वाजून ९ मिनिटांनी ३.२ आणि १ वाजून २४ मिनिटांनी २.९ रिश्टर स्केलचा हादरे जाणवले. त्याचवेळी डोडा येथे पहाटे गुरूवारी पहाटे ५:३७ वाजता २.६ रिश्टर स्केलचा भूकंप झाला. शेवटचा भूकंप किश्तवारमध्ये ५ एप्रिल रोजी रात्री ११ वाजून १ मिनिटांनी झाला होता, याची तीव्रता ३.२ इतकी होती, असेही राष्ट्रीय भूकंपविज्ञान केंद्राने दिलेल्या माहितीत म्हटले आहे. (Earthquake in Jammu & Kashmir)

SCROLL FOR NEXT