Latest

Earthquake in China : चीनमध्ये 6.2 रिश्टर स्केलचा भूकंप, 96 लोकांचा मृत्यू

Shambhuraj Pachindre

पुढारी ऑनलाईन डेस्क : चीनमध्ये सोमवारी रात्री उशिरा भूकंपाचे धक्के जाणवले. भूकंपाची तीव्रता 6.2 रिश्टर स्केल इतकी नोंदवण्यात आली आहे. भूकंपामुळे आतापर्यंत 95 जणांचा मृत्यू झाला आहे. त्याचबरोबर 200 जण जखमी झाले आहेत. चीनच्या वायव्येकडील गासू प्रांतात हा भूकंप झाला. भूकंपाची खोली 10 किलोमीटर इतकी आहे. भूकंपामुळे झालेल्या नुकसानीमुळे बचाव पथक घटनास्थळी पोहोचले आहे. (Earthquake in China)

चीनच्या सरकारी मीडिया रिपोर्टनुसार, भूकंपाची तीव्रता इतकी होती की, यामध्ये अनेक इमारती कोसळल्या. गांसू आणि किंघाई प्रांतात 6.2 तीव्रतेच्या भूकंपात किमान 111 लोकांचा मृत्यू झाल्याची समोर येत आहे. तर 230 हून अधिक जखमी झाले आहेत. भूकंपग्रस्त ठिकाणी प्रशासनाकडून बचावकार्य सुरू आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, भूकंपामुळे सर्वात जास्त नुकसान काउंटी, डियाओजी आणि किंघाई येथे झाले आहे. येथील अनेक इमारती कोसळल्यामुळे लोक ढिगाऱ्याखाली दबले गेले आहेत, त्यांना बाहेर काढण्यासाठी बचाव पथ प्रयत्न करण्यात व्यस्त आहेत. यामुळे मृत आणि जखमींच्या संख्येत वाढ होवू शकते. आपत्कालीन सेवांनी लोकांना मदत करण्यास सुरुवात केली असून पीडितांच्या मदतीसाठी बचाव कार्य केले जात आहे.

भूकंप का होतो?

पृथ्वीचा वरचा पृष्ठभाग सात टेक्टोनिक प्लेट्सपासून बनला आहे. या प्लेट्स जिथे-जिथे एकमेकांवर आदळतात तिथे भूकंपा होण्याचा धोका असतो. जेव्हा या प्लेट्स एकमेकांच्या क्षेत्रात जाण्याचा प्रयत्न करतात, तेव्हा भूकंप होतो, प्लेट्स एकमेकांवर घासतात, त्यातून प्रचंड ऊर्जा बाहेर पडते आणि त्या घर्षणामुळे पृथ्वीचा वरचा भाग हादरु लागतो, कधी आठवडे तर कधी महिने. ही ऊर्जा अधूनमधून बाहेर पडते.

SCROLL FOR NEXT