Latest

सणासुदीला झकास दिसायचं आहे ? मग इयररिंग्जचा हा ट्रेंड जरूर फॉलो करा

अमृता चौगुले

पुढारी ऑनलाईन डेस्क :  येत्या काही दिवसात दसरा, दिवाळी, करवाचौथ हे मोठे सण आता काही दिवसात येऊ घातले आहेत. सणाला प्रत्येकीलाच नेहमीपेक्षा खास दिसायचं असत. त्यामुळे कपडे, अॅक्सेसरी, दागिने या सगळ्याबाबत महिलावर्ग कमालीचा चुझी होतो. कोणते दागिने निवडावे, यातील नवीन ट्रेंड कोणते, याचा मागोवा घेतला जातो. अनेकदा महिलावर्ग इयररिंग निवडण्याबाबत कन्फ्युज असलेला दिसून येतो. चेहरा, मेक अप, पेहराव याला शोभणाऱ्या इयररिंग कशाप्रकारे निवडाव्यात याबाबत त्या अनेकदा साशंक दिसून येतात. इयररिंग्ज मध्ये फॉलो केले जाणारे ट्रेंड हे अनेकदा मालिका, सिनेमामधून दिसत असलेल्या नायिकांकडे पाहून ठरवला जातो. पण या उत्सवानिमित्त तुम्हालाही खास दिसायचं असेल तर हा ट्रेंड जरूर फॉलो करा.

झुमके : झुमके हा ऑल टाईम फेव्हरीट इयररिंग टाईप आहे. झुमक्यामध्येही नवे नवे ट्रेंड येताना दिसत आहेत. पण सध्या ऑक्सीडाईज झुमक्याना प्रचंड मागणी आहे. लहंगा, शरारा, साडी यासोबत तुम्ही हे झुमके कॅरी करू शकता.

कुंदन : काही हेवी निवडण्याची इच्छा असेल तर कुंदन इयररिंग्स हा उत्तम पर्याय आहे. कुंदन तुम्हाला पारंपरिक आणि मॉडर्न आशा दोन्ही डिझाईनमध्ये मिळेल. लेहंगे हा कुंदन ज्वेलरीसाठी सर्वोत्तम पर्याय आहे.

पेस्टल : कोण म्हणतं पेस्टल कलर फक्त कपड्यांमध्ये चांगला दिसतो. सध्या ज्वेलरीमध्येही हा ट्रेंड जोरात आहे. हुप्स, मिनिमिलिस्टीक असो किंवा हेवी हे इयररिंग्ज सगळ्या प्रकारच्या आऊटफिटवर कमालीचे उठून दिसतात.

स्टेटमेंट : सध्या ट्रेंडमध्ये असलेली ज्वेलरी म्हणजे स्टेटमेंट ज्वेलरी. नाव असलेले, काही शब्द लिहिलेले इयररिंग्जना अनेकजणी पसंती देत आहेत.

स्टोन : स्टोन ज्वेलरी हा देखील ट्रेंड लोकप्रिय आहे. मॅचिंग किंवा मिसमॅच लुक कॅरी करण्यासाठी स्टोन इयररिंग्ज ना पसंती दिली आहे.

SCROLL FOR NEXT