Latest

राज्यात लवकरच ई-रेशन कार्ड

Arun Patil

कोल्हापूर, अनिल देशमुख : राज्यात लवकरच ई-रेशन कार्ड मिळणार आहेत. सध्या त्याची तयारी सुरू आहे. विशेष म्हणजे क्यूआर कोडसह असलेल्या या रेशन कार्डाशी सर्व नोंदी कार्डधारकांना घरबसल्या करता येणार आहेत.

राष्ट्रीय अन्नसुरक्षा अधिनियमानुसार राज्यात अंत्योदय आणि प्राधान्य कुटुंबांना धान्य दिले जाते. याशिवाय काही जिल्ह्यांत राज्य योजनेंतर्गत अंत्योदय शेतकरी म्हणूनही धान्य देण्यात येते. ई-पॉस मशिनद्वारे धान्य वितरण केले जात आहे. लवकरच कार्डधारकांना डेबिट कार्डही दिले जाणार आहे.

डिजिटलच्या जमान्यात पारंपरिक रेशन

कार्ड हद्दपार होणार आहे. आता हव्या त्या वेळेला, हव्या त्या ठिकाणी रेशन कार्ड डाऊनलोड करता येणार आहे. त्यासाठी क्यूआर कोड असलेली ई-रेशन कार्डे दिली जाणार आहेत.

ई-रेशन कार्ड संबंधित कोणत्याही नोेंदीसाठी संबंधित कार्यालयात जावे लागणार नाही. या सर्व नोंदी ऑनलाईन पद्धतीने संबधित कार्डधारकाला घरबसल्या करता येणार आहेत. त्यासाठी शुल्क भरावे लागेल. अंत्योदय कार्डधारकांना 25 रुपये, प्राधान्य कुटुंब, एपीएल शेतकरी तसेच राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजना व्यतिरिक्त आणि एपीएल शेतकरी व्यतिरिक्त अन्य कार्डधारकांना 50 रुपये तर शुभ— कार्डधारकांना 100 रुपये शुल्क ऑनलाईन भरावे लागेल. यामुळे गैरप्रकारांना आळा बसणार आहे.'

SCROLL FOR NEXT