Latest

Pune Ganeshotsav Dry Day : गणेशोत्सवादरम्यान पुण्यात या दिवशी असणार ‘Dry Day’ ; वाचा सविस्तर

अमृता चौगुले

पुढारी ऑनलाईन : येत्या 19 सप्टेंबरपासून गणेशोत्सवास सुरुवात होत आहे. त्यामुळे कायदा आणि सुव्यवस्था कायम ठेवण्यासाठी गणेशोत्सवातील काही दिवस मद्यविक्री बंद राहणार आहे. यामध्ये परमीट रूम आणि बियरबारचाही समावेश आहे. गणेशोत्सव कालावधीत एकूण पाच दिवस dry day पाळण्याचे आदेश जिल्हाधिकारी यांनी दिले आहेत. यामध्ये गणेशोत्सवाच्या पहिल्या दिवशी म्हणजे 19 सप्टेंबर, अनंत चतुर्दशी दिवशी म्हणजे 28 सप्टेंबर, 28 तारखेची बंदी दुसऱ्या दिवशी म्हणजे 29 सप्टेंबरपर्यंत मिरवणूक सुरू असेपर्यंत राहील. हा नियम संपूर्ण पुणे जिल्हयाकरिता लागू राहील. यानंतर ज्या ठिकाणी गणेशोत्सवाच्या पाचव्या किंवा सातव्या दिवशी विसर्जन मिरवणुका असतील.

संबंधित विभाग :

किंवा मिरवणुका त्या मार्गावरून जाणार असतील तर त्या मार्गावरील मद्यविक्रीची सर्व दुकाने, परमिट रूम, बियर बार मिरवणूक संपेपर्यंत बंद राहतील असे जिल्हाधिकाऱ्यांनी जाहीर केलेल्या पत्रकात म्हटले आहे.

हे ही वाचा :

SCROLL FOR NEXT