Latest

द्रौपदी मुर्मू यांना देण्यात आले निवडून आल्याबाबतचे प्रमाणपत्र

रणजित गायकवाड

नवी दिल्ली; पुढारी वृत्तसेवा : राष्ट्रपती निवडणुकीत विजय प्राप्त केलेल्या राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांना राज्यसभा महासचिव आणि निवडणूक अधिकारी पी. सी. मोदी यांनी निवडून आल्याबाबतचे प्रमाणपत्र शुक्रवारी प्रदान केले. देशाच्या १५ व्या राष्ट्रपती म्हणून द्रौपदी मुर्मू येत्या सोमवारी पद आणि गोपनीयतेची शपथ घेणार आहेत.

नुकताच पार पडलेल्या राष्ट्रपती निवडणुकीत मुर्मू यांनी विरोधी आघाडीचे उमेदवार यशवंत सिन्हा यांचा पराभव केला होता. मुर्मू यांना २८२४ मते (मतांचे एकूण मूल्य ६ लाख ७६ हजार ८०३) मिळाली होती तर सिन्हा यांना १८७७ मते (मतांचे एकूण मूल्य ३ लाख ८० हजार १७७) पडली होती. या निवडणुकीत ४७५४ आमदार व खासदारांनी मतदान केले होते. निवडणूक अधिकारी पी. सी. मोदी यांनी मुर्मू यांना त्यांच्या निवासस्थानी जाऊन त्या विजयी झाल्याचे प्रमाणपत्र दिले.

SCROLL FOR NEXT