Latest

Muslim Mahasabha on Nikah : ‘डीजे’ किंवा बँड वाजविल्‍यास ‘निकाह’ लावू नका : मुस्‍लिम महासभेचे मौलवींना आवाहन

नंदू लटके

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : निकाहावेळी जर डीजे ( डिस्‍क जॉकी ) आणि बँड वाजविल्‍यास निकाह लावू नका, असे आवाहन उत्तर प्रदेशमधील गाझियाबाद येथील मुस्‍लिम महासभा संघटनेने मौलवींना केले आहे. ( Muslim Mahasabha on Nikah  ) साध्‍या पद्धतीने विवाह समारंभाचे आयोजन करण्‍यासाठी मौलवींनी मुस्‍लिम समुदायाचे प्रबोधन करावे, अशी मागणी करणारे निवेदनही मुस्‍लिम महासभेने जारी केले असल्‍याचे वृत्त 'पीटीआय'ने दिले आहे.

Muslim Mahasabha on Nikah :  पैशांची उधळपट्‍टी करणे चुकीचे

मुस्‍लिम महासभेने दिलेल्‍या निवेदनात म्‍हटलं आहे की, निकाहाच्‍या समारंभात पैशांची उधळपट्‍टी करणे चुकीचे आहे. अलिकडे निकाहामध्‍ये मोठ्या प्रमाणावर पैसे खर्च केले जातात. झारखंडमधील धनबाद जिल्‍ह्यातील मौलवींच्‍या एका गटाने निकाहावेळी मोठ्या आवाजात संगीत वाजवणे, फटाके फोडणे यासारख्‍या इस्‍लाम बाह्य प्रथा बंद करण्‍याचे आवाहन केले आहे. याचे उल्‍लंघन करणार्‍यांना दंड ठोठावला जाईल, असेही स्‍पष्‍ट केले आहे, असेही निवदेनात नमूद केले आहे.

निकाहाच्‍या कार्यक्रमात डिजे आणि बँड वाजविण्‍यास सिबिलीबाडी जामा मशिदीचे प्रमुख इमाम मौलाना मसूद अख्‍तर यांनी विरोध केला आहे. इस्‍लाममध्‍ये अशा प्रथांना परवानगी नाही. यामुळे नागरिकांची गैरसोय होते, असेही त्‍यांनी म्‍हटलं आहे.

हेही वाचा :

SCROLL FOR NEXT