Latest

एका फोटोने मिळाले ५७ कोटी रुपये! ट्रम्‍प यांना अटकेचा ‘देगणी’रुपी फायदा

नंदू लटके

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : अमेरिकेचे माजी राष्‍ट्राध्‍यक्ष डोनाल्‍ड ट्रम्‍प ( Donald Trump)  यांच्‍या नुकत्‍याच काढण्‍यात आलेल्‍या एका फोटोला प्रचंड पाठिंबा मिळाला आहे. गेल्‍या दोन दिवसांमध्‍ये केवळ या एका फोटोमुळे त्‍यांच्‍या पक्षाला निवडणूक लढविण्‍यासाठी सुमारे ७ मिलियन डॉलर म्‍हणजे तब्‍बल ५७ कोटी रुपयांच्‍या देणग्‍या मिळाल्‍या आहेत. जाणून घेवूया या प्रकरणाविषयी..

ट्रम्‍प समर्थकांचा 'देगणी'रुपी उदंड प्रतिसाद

जॉर्जिया प्रकरणात डोनाल्‍ड ट्रम्‍प यांना गुरुवार दि २४ ऑगस्‍ट रोजी अटक करण्‍यात आली. अमेरिकेच्‍या इतिहासात मुगशॉट ( एखाद्‍या गुन्‍हेगारांप्रमाणे घेण्‍यात आलेला फोटो ) घेतलेले ते पहिले माजी अध्यक्ष बनले होते. मात्र आता त्‍यांच्‍या याच फोटोला त्‍यांच्‍या समर्थकांचा उदंड प्रतिसाद मिळत असल्‍याचे चित्र आहे. कारण गेल्‍या दोन दिवसांमध्‍ये २०२४ मधील राष्‍ट्राध्‍यक्ष निवडणूक लढविण्‍यासाठी डोनाल्‍ड ट्रम्‍प यांना मिळालेल्‍या देणग्यांमध्ये मोठी वाढ झाली आहे.

जॉर्जियाची निवडणूक उलथवण्याचा कट रचल्याच्या आरोपावरून ट्रम्प यांनी २४ रोजी फुल्टन काउंटी जेलमध्ये आत्मसमर्पण केले. ट्रम्प यांचा फोटो एका गुन्हेगारांप्रमाणे घेण्यात आला. हा फोटो ट्रम्प यांनी स्वतः सोशल मीडियावर शेअर केला होता. ट्रम्प यांचे प्रवक्ते स्टीव्हन चेंग यांनी सांगितले की, केवळ शुक्रवारीच सुमारे ४ दशलक्ष डॉलर देणगी मिळाली, जी एका दिवसात मिळालेली सर्वाधिक देणगी ठरली आहे. ट्रम्प यांना लोकांची सहानुभूती मिळत असल्याचे मानले जात आहे.

अध्यक्ष बायडेन यांनी त्‍या' फोटोवरुन Donald Trump यांना 'लगावला होता टोला

अमेरिकेचे राष्‍ट्राध्‍यक्ष ज्‍यो बायडेन यांनीही ट्रम्‍प याच्‍या गुन्‍हेगारासारख्‍या काढलेल्‍या फोटोची खिल्‍ली उडली होती. या फोटोत डोनाल्‍ड ट्रम्‍प हेअधिक सुंदर दिसत आहेत, असा टोला त्‍यांनी लगावला होता. दरम्‍यान, जॉर्जिया प्रकरणातील सर्व आरोप हे राजकीय हेतूने प्रेरित असल्याचे ट्रम्प यांनी म्हटले आहे. अनेक प्रकरणांमध्ये आरोप झाल्यानंतरही ट्रम्प यांची लोकप्रियता कमी झालेली नाही. रिपब्लिकन पक्षाकडून 2024 च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत डोनाल्‍ड ट्रम्‍प हेच सर्वात शक्तिशाली उमेदवार मानले जात आहेत.

हेही वाचा : 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT