Latest

LPG Cylinder Rate : गॅस सिलिंडरचे दर वाढले, खिशाला लागणार कात्री

backup backup

पुढारी ऑनलाइन डेस्क : सर्व सामान्यांच्या खिशाला पुन्हा एकदा कात्री लागणार आहे. घरगुती वापराचा गॅस 'एलपीजी सिलिंडर'चे दर वाढले आहे. 14.2 किलोच्या सिलिंडरच्या किमतीत 50 रुपयांनी वाढ झाली आहे. दिल्लीत घरगुती एलपीजी सिलिंडरची किंमत 1103/ रुपयांपर्यंत वाढली आहे. तर 19 किलोच्या व्यावसायिक एलपीजी सिलिंडरच्या किमतीत 350.50 रुपयांनी वाढ झाली असून, या वाढीमुळे दिल्लीत 19 किलोच्या व्यावसायिक सिलिंडरची किंमत 2119.50 रुपये होणार आहे. नवीन दर आजपासून लागू होतील, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. एएनआय वृत्त संस्थेने याबाबतचे ट्विट केले आहे.

सरकारने 1 फेब्रुवारीला अर्थसंकल्प सादर केल्यानंतर नवीन आर्थिक वर्ष सुरू होण्यापूर्वीच सर्वसामान्यांना महागाईचा आणखी फटका बसणार आहे. कारण आज 1 मार्चपासून घरगुती आणि व्यावसायिक गॅस सिलिंडरचे दर वाढणार आहे. या वाढीमध्ये घरगुती गॅसचे दर 50 रुपयांनी वाढल्याने गृहिणींंची चिंता देखील वाढली आहे.

जानेवारी महिन्यात नववर्षाच्या सुरुवातीलाच व्यावसायिक गॅसचे दर वाढले होते. व्यावसायिक गॅसचे दर 25 रुपयांनी वाढल्याने आधीच रेस्टॉरंट, हॉटेल, स्ट्रीट फूड अशा सर्वच प्रकारच्या खाद्य पदार्थांचे दर वाढले होते. त्यानंतर आता पुन्हा व्यावसायिक सिलिंडरच्या किंमती 350 रुपयांनी वाढल्याने हॉटेल, मेस, असे बाहेरचे जेवण  आणखी महागणार आहे.

SCROLL FOR NEXT