Latest

चीन दौर्‍यानंतर मालदीवच्‍या अध्‍यक्षांची ‘भाषा’ बदलली; म्‍हणे, “आम्‍हाला धमकवण्‍याचा…”

नंदू लटके

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : पाच दिवसांच्‍य चीन दौर्‍यावरुन मायदेशी परतल्‍यानंतर मालदीवचे अध्‍यक्ष मोहम्‍मद मुईइ्‍झू (Maldives President Muizzu )यांची भाषा बदलली आहे. मालदीवच्‍या मंत्र्यांनी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्‍या लक्षद्वीप दौर्‍यावर आक्षेपार्ह टीकेनंतर उभय देशांमधील संबंध कमालीचे ताणले गेले आहे. अशातच अध्‍यक्ष मुईइ्‍झू यांनी अप्रत्‍यक्षपणे पुन्‍हा एकदा भारताला डिवचण्‍याचा प्रयत्‍न केला आहे.

Maldives President Muizzu : आम्‍हाला धमकवण्‍याचा अधिकार नाही

चीन दौर्‍याची सांगता झाल्‍यानंतर आज ( दि.१३) माध्‍यमांशी बोलताना अध्‍यक्ष मोहम्‍मद मुईइ्‍झू म्‍हणाले की, कोणत्‍याही देशाला आम्‍हाला धमकवण्‍याचा अधिकार नाही. आम्ही लहान असू शकतो; परंतु हा तुम्हाला आमच्यावर दादागिरी करण्याचा परवाना देत नाही,"

मालदीवच्‍या मंत्र्यांनी पंतप्रधान मोदी यांच्या लक्षद्वीप दौरा म्‍हणजे  भारतीय पर्यटकांना मालदीवपासून लांब राहण्‍यचा सल्‍ला मानला.  या दौऱ्याबद्दल मालदीवच्या काही राजकीय नेत्यांनी मंत्र्यांनी पंतप्रधान नरेंद्र माेदी यांच्‍यावर आक्षेपार्ह टीका केली. भारताने मालदीवकडे हा मुद्दा उपस्थित केला. यानंतर ७ जानेवारी रोजी तीन मंत्र्यांना त्यांच्या पदावरून निलंबित करण्यात आले. मालदीवच्या भारतातील राजदूतांना समन्‍स बजावण्‍यात आले. त्‍यांना भारतीय परराष्ट्र मंत्रालयात बोलावण्यात आले. त्यांनी पंतप्रधान मोदींविरोधात सोशल मीडिया पोस्टबद्दल तीव्र चिंता व्यक्त केली होती.

मालदीवच्या मंत्र्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्‍यावर केलेल्‍या आक्षेपार्ह टीकेमुळे भारतीय संतप्त झाले. मालदीवमध्‍ये साजरी करण्‍यात येणार्‍या नियोजित सुट्ट्या रद्द केल्या यानंतर चीनमध्ये राज्य दौऱ्यावर असलेले मालदीवचे अध्यक्ष मुइझ्झू यांनी आमच्‍या देशात अधिक पर्यटकांना पाठवा, अशी याचनाच चीनला केली आहे.

हेही वाचा : 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT