Latest

‘बिग बॉस 16’च्या घरात धमाल करण्यासाठी सज्ज असलेल्या टिना दत्ता बाबत हे माहिती आहे का?

अमृता चौगुले

पुढारी ऑनलाईन डेस्क : अनेक मालिकांमधून सोज्वळ व्यक्तिरेखेत दिसलेली अभिनेत्री टिना दत्ता आता बिग बॉसच्या घरात धमाल करण्यासाठी सज्ज झाली आहे. उतरन या हिन्दी सिरिअलमधून ती प्रेक्षकांच्या भेटीला आली होती. या मालिकेतील तिच्या इच्छा या सालस व्यक्तिरेखेने प्रेक्षकांची मनं जिंकली. ही व्यक्तिरेखा इतकी प्रसिद्ध झाली की फॅन्स तिला सोशल लाईफमध्येही इच्छा म्हणूनच हाक मारू लागले.

तुम्हाला माहिती आहे का ? टिना वयाच्या पाचव्या वर्षांपासूनच अभिनय करताना दिसते आहे. 'सिस्टर निवेदिता' या मालिकेत ती दिसली होती. याशिवाय परिणीता या सिनेमातही ती दिसली होती.

टिना बंगाली आहे. त्यामुळे मातृभाषेतील अनेक सिनेमा आणि मालिकांमध्येही टिना झळकली आहे. उतरन नंतर तिने 'डायन' या मालिकेतही अभिनय केला होता.

याशिवाय टिना 'खतरों के खिलाडी' च्या सातव्या सीझनमध्येही दिसली होती. अर्थात या शोमध्ये तिला यश मिळू शकलं नव्हतं.

SCROLL FOR NEXT