'आमच्या घरात विजेचा वापर खूप कमी आहे, तरी बिल मात्र जास्तच येते', 'या महिन्यात बिल जबरदस्त वाढून आले आहे' अशी वाक्ये कमी-अधिक प्रमाणात सर्वच घरांत ऐकावयास मिळतात; परंतु ग्राहक म्हणून आपण जागरूक राहिलो, तर हे बिल कमी होण्यास मदत होते. त्यासाठी आपणास काळजी घेणे आवश्यक आहे.
हे करा
- मीटर रिडिंग घेण्यास येणार्या व्यक्तीचे नाव, आय डी. प्रूफ आणि रिडिंग घेतल्याच्या तारखेला त्याची सही घ्यावी.
- पुढचे रिडिंग 30 दिवसांनंतरच घेतले जाते काय, याची खात्री करावी.
- मुदतीत रिडिंग न घेतल्यास युनिटचा स्लॅब बदलू शकतो आणि त्यामुळे बिल वाढते.
- अपार्टमेंटधारकांनी वॉचमनकडून या गोष्टी करून घ्याव्यात.
विजेचे दर
- 100 युनिटपर्यंत 4 रुपये 41 पैसे प्रतियुनिट आहे.
- 100 च्या वर 9 रुपये 64 पैसे
- 300 च्या वर 13 रुपये 61 पैसे
- 500 युनिटच्या वर 15 रुपये 57 पैसे
अशी होते बिल आकारणी
स्थिर आकार, वीज आकार, वहन आकार, वीज शुल्क, थकीत बिलाच्या रकमेवर 28 टक्के व्याज, इंधन समायोजन.