Latest

Health Tips : ‘हे’ पदार्थ खाल्ल्यानंतर लगेच पाणी पिऊ नये!

Arun Patil

नवी दिल्ली : बरेच लोक जेवल्यानंतर जास्त पाणी पितात, जे आरोग्यासाठी चांगले नाही. आरोग्यतज्ज्ञांच्या मते, जेवणाच्या एक तास आधी पाणी प्यावे. जेवताना किंवा नंतर लगेच जास्त पाणी प्यायल्याने आरोग्याच्या अनेक समस्या उद्भवू शकतात. काही पदार्थ खाल्ल्यावर लगेच पाणी पिऊ नये. अशा पदार्थांची ही माहिती… (Health Tips)

मसालेदार अन्न : मसालेदार अन्न खाल्ल्यानंतर अनेक लोक लगेच जास्त पाणी पितात. त्यामुळे तोंडात जळजळते. तसेच सूज येण्याचाही त्रास होऊ शकतो. (Health Tips)

तेलकट पदार्थ : तेलकट पदार्थ खाल्ल्यानंतर लगेच पाणी पिऊ नये. यामुळे पोटात जडपणा आणि सूज येण्याची समस्या होऊ शकते. जेवल्यानंतर फक्त 30 मिनिटांनी पाणी प्या, ते तुमच्या आरोग्यासाठी चांगले राहील.

कार्बोनेटेड पेये : काही लोकांना जेवल्यानंतर लगेच कार्बोनेटेड पाणी किंवा सोडा प्यायला आवडते; परंतु यामुळे काही लोकांना पोट फुगणे आणि गॅसची समस्या उद्भवू शकते. त्यामुळे अपचनाचा त्रासही होऊ शकतो. जड

अन्न : पोट भरून जेवल्यावर लगेच भरपूर पाणी प्यायल्याने पोटाचा जडपणा आणखी वाढू शकतो. जेवल्यानंतर लगेच मोठ्या प्रमाणात पाणी पिणे टाळावे.

लिंबूवर्गीय फळे : लिंबूवर्गीय फळे म्हणजे संत्री, द्राक्षे आणि लिंबू इत्यादींमध्ये व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात असते. ते रसदार असतात आणि त्यात भरपूर पाणी असते. ही फळे खाल्ल्यानंतर लगेचच जास्त प्रमाणात पाणी प्यायल्यास पचनास त्रास होऊ शकतो.

दही : दही हे पचनासाठी खूप फायदेशीर मानले जाते. यात प्रोबायोटिक्स भरपूर प्रमाणात असतात. ते खाल्ल्यानंतर लगेच पाणी प्यायल्याने प्रोबायोटिक्स नष्ट होतात.

भात : भात खाल्ल्यानंतर मोठ्या प्रमाणात पाणी पिणे पचनासाठी हानिकारक ठरू शकते. भात खाण्यापूर्वी एक ग्लास पाणी पिणे ठीक असले तरी भात खाल्ल्यानंतर लगेच जास्त पाणी पिणे टाळा. भात खाल्ल्यानंतर अर्धा किंवा एक तासानंतरच पाणी प्या. ते पचायला थोडा वेळ मिळेल आणि पोटात जडपणा जाणवणार नाही.

हेही वाचा : 

SCROLL FOR NEXT