Latest

बाळासाहेब भाऊंचा राजीनामा मंजूर करू नका ; माळेगावात अजित पवारांना साकडे

अमृता चौगुले

शिवनगर :  माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या कार्यस्थळी येत असताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा ताफा अडविण्यात आला. कारखान्याचे अध्यक्ष बाळासाहेब भाऊ तावरे हे चांगले काम करत आहेत.नुकताच त्यांनी राज्यातील उच्चांकी असा प्रतिटन ३४११ रुपये ऊस दर दिलेला आहे. दुसरीकडे एकूणच त्यांची काटकसरीने काम करण्याची पद्धत,संस्थेच्या हिताची असल्याने माळेगाव कारखान्याच्या सभासदांच्या आणि कामगारांच्या हितासाठी ते अध्यक्षपदी असावेत तसेच माळेगाव साखर कारखाना संचलित शिवनगर विद्या प्रसारक मंडळाचे इंजिनिअरिंग कॉलेज,फार्मसी कॉलेज,हायस्कूल,इंग्लिश मीडियम स्कूल या शैक्षणिक संस्थांचा कारभार देखील बाळासाहेब भाऊंच्या मार्गदर्शनाखाली उत्तम रीतीने चालू आहे. अशावेळी,बाळासाहेबभाऊ तावरे अध्यक्षपदी असणे महत्त्वाचे आहे.त्यासाठी दादा.. बाळासाहेब भाऊंचा राजीनामा मंजूर करू नका… अशी गळ माळेगाव साखर कारखान्याचे सभासद तसेच कामगारांनी यावेळी पवार यांना घातली

शुक्रवारी ( दि.८) माळेगाव साखर कारखाना कार्यस्थळावर उपमुख्यमंत्री अजित पवार जात असताना त्यांच्याकडे निवेदनाद्वारे ही मागणी करण्यात केली. यावेळी अजित पवार म्हणाले, माळेगाव साखर कारखान्याची पंचवार्षिक निवडणूक झाल्यानंतर पहिले अडीच वर्ष बाळासाहेब तावरे आणि नंतर इतरांना संधी देण्याचे ठरले होते,याबाबत शरद पवार यांच्याशीही चर्चा झाली असता त्यांनी प्रतिक्रिया दिली नाही.आता देखील मी बाळासाहेब तावरे यांना राजीनामा मागितला नाही ते स्वतः माझ्याकडे दोन वेळा येऊन गेले आणि तब्येतीचे कारण सांगत मला अध्यक्षपदा करून मुक्त करा असे सांगितले.जर बाळासाहेब तावरे स्वतःहून म्हणाले की मी अध्यक्षपदी कायम राहण्यास तयार आहे तर माझी काही हरकत नाही.असे अजित पवार यांनी यावेळी सांगितले बहुसंख्येने सभासद व कामगार उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री अजित पवार हे माळेगाव ग्रामपंचायतीचे माजी सरपंच दिवंगत मधुकर तावरे यांच्या कुटुंबियांचे सांत्वन करण्यासाठी माळेगाव कारखाना कार्यस्थळावर आले होते. दरम्यान माळेगाव साखर कारखान्याचे अध्यक्ष बाळासाहेब तावरे यांचा राजीनामा शनिवारी ( दि.९) कारखाना संचालक मंडळाच्या होणाऱ्या बैठकीत ठेवण्यात येणार आहे.यावेळी कोणता निर्णय होईल याकडे सर्व ऊस उत्पादक शेतकरी सभासदारांसह कामगारांचे लक्ष लागले आहे.

हेही वाचा :

SCROLL FOR NEXT