Latest

Healthy Diwali : फराळ खाल्ल्यानंतर तुमचेही वजन वाढते का? टेन्शन घेऊ नका, हे वाचा

स्वालिया न. शिकलगार

पुढारी ऑनलाईन डेस्क : दिवाळीतील फराळ म्हटलं की, लाडू, करंज्या, चकल्या, चिवडा नुसता पाहून तोंडाला पाणी सुटतं. मग संपूर्ण दिवाळीभर नुसता फराळावर ताव मारला जातो. तळेलेले आणि मसालेदार पदार्थ याकाळात अधिक खाल्ले जातात. पण, नंतर अनेकांना वजन वाढल्याचेजाणवते. कधी कधी या पदार्थांमुळे तुमचे वजन वाढण्याची शक्यता असते. पण, टेन्शन घेऊ नका. ही पुढील माहिती शेवटपर्यंत वाचा आणि अंमलबजावणी करा. जर तुम्हाला वजन कमी करायचं असेल तर या टिप्स नक्की तुम्हाला मदत करतील. (Healthy Diwali)

पौष्टिक आणि सकस पदार्थ खा

दिवाळीत समोर फराळाचे पदार्थ आहेत म्हणून काहीही खाऊ नका. जे तुमच्या शरीरासाठी आवश्यक आहे आणि पौष्टिक आहे त्यावर भर द्या. दिसेल ते खात सुटला तर नक्कीच तुमच्या आरोग्यावर परिणाम होणार. त्याचबरोबर तुमचं वजन वाढायला सुरुवात होईल, हे निश्चित. जर वजन वाढवायचं नसेल तर पौष्टिक आणि सकस आहारावर भर द्या.

आग्रहाला बळी पडू नका

दिवाळी सणात पाहुण्यांच, शेजाऱ्यांच, मित्र-मैत्रिणींच आपल्या घरी येणजाणं होतं. तर आपलं त्यांच्याही घरी जाणं होतं. पाहुणचार म्हणून फराळ देतो. यावेळी आग्रह हा होणारचं. पण आग्रह होतोय आणि समोरच्या व्यक्तीचं मन कस मोडायचं असं वाटत असेल तर थोड थांबा आणि आपल्या आरोग्याचा विचार काराच आणि तुम्हाला तुमचं वजन कमी करायचा याचा पण विचार करा आणि थोडचं खा.  जेणेकरुन समोरच्या व्यक्तीचा आदरही राखला जाईल आणि तुमचं वजन कमी होण्यास मदत होईल.

पुरेसे पाणी प्या

दिवाळीच्या दरम्यान हिवाळ्याला सुरुवात होते. थंडी लागायला सुरुवात होते.  त्वचेवर परिणाम होतो. रुक्ष त्वचा व्हायला सुरुवात होते. थंडीमूळे तहान लागत नाही. पाण्याच प्रमाण कमी होत. याचा परिणाम आपल्या आरोग्यावर होतो. पण जर तुम्ही पाणी शरिराला आवश्यक आहे तेवढं पिलं तर वारंवार खाण्याची इच्छा कमी होईल. गोड खाण्याचं प्रमाण कमी होईल. कमी खाल्ल की वजनवाढीचा धोकाही कमी होईल.

संग्रहित छायाचित्र.

नियमितपणे चालायला जा

दिवाळीच्या दिवसात आपली धावपळ होत असते. पाहुण्यांची येजा, पदार्थ बनवणं, सण साजरा करणे यात आपलं आपल्या शरीराकडे दुर्लक्ष करतो. त्यात गोडधोड आणि तेलकट खाण्याचेही प्रमाण आपलं वाढत असतं. याचा परिणाम आपल्या आरोग्यावर होत राहतो. जर का तुम्हाला तुमचं वजन नियंत्रित करायच असेल, आपलं आरोग्य चांगलं ठेवायचं असेल तर तुम्ही दरदरोज चालायला जा.

प्रोटीन खाण्यावर भर द्या

प्रोटीन खाल्याने वारंवार भूक लागण्याची इच्छा कमी होते. दिवाळी काळात प्रोटीन्स खाण्यावर भर द्या. जेणेकरुन तुम्हाला सतत खायची इच्छा होणार नाही,. परिणामी तुमच्याकडून या दिवसात गोडधोड आणि तेलकट खाण्याचे प्रमाण कमी असेल व तुमचं वजन संतुलित राहून आरोग्य चांगले राहण्यास मदत होते.

SCROLL FOR NEXT