Latest

Diwali Bonus : दिल्लीतील सरकारी कर्मचाऱ्यांना दिवाळीचा बोनस जाहीर

अविनाश सुतार

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : दिल्लीतील सरकारी कर्मचाऱ्यांना मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी दिवाळी बोनस देण्याची घोषणा केली आहे. ८० हजार कर्मचाऱ्यांना बोनस मिळणार असून यासाठी राज्य सरकारचे ५६ हजार कोटी रुपये खर्च होणार आहेत. याबाबतची घोषणा मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी आज (दि.६) केली आहे. (Diwali Bonus)

राज्य सरकारतर्फे दिवाळीला ग्रुप बी आणि सी कर्मचाऱ्यांना बोनस देण्यात येईल. दिल्ली सरकारचे सर्व कर्मचारी आपल्या कुटुंबातील सदस्यां सारखे आहेत. सणासुदीच्या या काळात आम्ही दिल्ली सरकारी कर्मचाऱ्यांना ७,००० रुपयांचा बोनस जाहीर केला आहे., असे केजरीवाल म्हणाले. ही दिवाळीपूर्वी ८० हजार कर्मचाऱ्यांना भेट असल्याचेही मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल म्हणाले यासाठी ५६ हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे, असेही केजरीवाल यांनी स्पष्ट केले. (Diwali Bonus)

दरम्यान, दिल्ली सरकारने महामंडळाच्या पाच हजार सफाई कर्मचाऱ्यांना सेवेत नियमित केले आहे.तर ३१०० डीबीसी कर्मचाऱ्यांना मल्टी टास्क स्टाफ (एमटीएस) म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. याशिवाय स्वच्छता यंत्रणा बळकट करण्यासाठी आणि कचऱ्याचे डोंगर हटवण्यासाठी समांतर एजन्सी स्थापन करण्याचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला आहे. हे सर्व प्रस्ताव मंगळवारी दिल्ली महापालिकेमध्ये मंजूर करण्यात आले. स्थायी समितीची स्थापना झाल्यानंतर ही कामे मार्गी लागण्यास मदत होईल, असे महापालिकेचे म्हणणे आहे. याआधी केंद्र सरकारने आपल्या ग्रुप सी, ग्रुप डी आणि ग्रुप बीच्या कर्मचाऱ्यांसाठी दिवाळी बोनस जाहीर केला होता.

हेही वाचा 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT