Latest

पिंपरी-चिंचवड: महापालिका अधिकार्‍यांकडील कामांची विभागणी

अमृता चौगुले

पिंपरी, पुढारी वृत्तसेवा: पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या विद्युत, नगररचना विभागातील अधिकार्‍यांच्या कामकाजाची विभागणी करण्यात आली आहे. त्यामुळे कामात अधिक सुसूत्रता येणार आहे, असा विश्वास आयुक्त राजेश पाटील यांनी व्यक्त केला आहे.
विद्युत विभागाचे सहशहर अभियंता संदेश चव्हाण व संजय खाबडे यांच्याकडे विविध विभाग वाटून देण्यात आले आहेत. चव्हाण यांच्याकडे अ, ब, ई व फ क्षेत्रीय कार्यालय, विद्युत मुख्य कार्यालय, दक्षता व गुण नियंत्रण, कार्यशाळा, मध्यवर्ती भांडार, अपारंपरिक ऊर्जा सौर, ईव्ही चार्जिंग स्टेशन व संबंधित कामकाज सोपविण्यात आले आहेत. तर, खाबडे यांच्याकडे क, ड, ग व ह क्षेत्रीय कार्यालय, दापोडी ते निगडी रस्ता वाहतूक नियोजन व बीआरटीएससह, स्मार्ट सिटी प्रकल्पाची जबाबदारी आहे.

नगररचना विभागाचे सहायक संचालक प्रशांत शिंपी व संदेश खडतरे यांच्याकडेही विविध विभाग सोपविण्यात आले आहेत. शिंपी यांच्याकडे दिघी, बोपखेल, चोविसावाडी, वडमुखवाडी, दापोडी, सांगवी, पिंपळे निलख, पिंपळे सौदागर, पिंपळे गुरव, भोसरी, पिंपरी, रहाटणी, थेरगाव या भागाची जबाबदारी सोपविण्यात आली आहेत. तर, खडतरे यांच्याकडे मोशी, बोर्‍हाडेवाडी, डुडूळगाव, चर्‍होली, तळवडे, चिखली, रावेत, किवळे, मामुर्डी, पुनावळे, ताथवडे, आकुर्डी, चिंचवड, निगडी भागांची जबाबदारी देण्यात आली आहे.

नगररचना विभागाशी संबंधित नवनगर विकास प्राधिकरण, टीपी स्किम, एसआरए, पंतप्रधान आवास योजना, राष्ट्रीय महामार्ग, मेट्रो, रिंग रोड, रेल्वे, बीआरटीएस, पीएमआरडीए, टीडीआर, स्मार्ट सिटी, नदीची पूररेषा, नदी सुधार योजना, रेड झोन, अर्थसंकल्प, शासकीय व संरक्षण विभागाकडील जमिनीची मागणी आदी कामकाज असणार आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT