Latest

प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरेंवर बडतर्फची कारवाई; शरद पवारांनी ट्वीट करत दिली माहिती

backup backup

पुढारी ऑनलाईन डेस्क : अजित पवार यांच्या बंडानंतर शरद पवार चांगलेच सक्रिय झाले आहेत. त्यांनी प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून बडतर्फ केले आहे. याबाबत पवार यांनी ट्वीटरवरुन माहिती दिली आहे. मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अध्यक्ष या नाताने प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांना पक्षविरोधी कारवाया केल्यामुळे त्यांचे पक्षाचे सदस्यत्व रद्द करत आहे, असे शरद पवार ट्वीट करताना म्हणाले आहेत.

९ आमदार वगळता बाकीच्या आमदारांना पक्षाची दारे खुली : जयंत पाटील

अजित पवार यांच्यासोबत गेलेले आमदार शरद पवार आणि मला संपर्क करत आहे. त्यांनी सांगितले आहे की त्यांना धोक्याने तिथे नेले होते. ज्या ९ आमदारांनी शपथ घेतली ते आमदार वगळता तिथे गेलेल्या सर्वांना आमची दारे खुली आहेत. काही काळ आम्ही त्यांच्यासाठी थांबू, एका विशिष्ट कालावधीनंतर आम्हाला त्यांच्यावर कारवाई करावी लागेल, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी माध्यमांशी बोलताना दिली.

येत्या ५ जुलै रोजी शरद पवार मुंबई येथे यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे बैठक बोलवली आहे. या बैठकीला सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित राहतील. या बैठकीला प्रचंड गर्दी होईल, असा विश्वास जयंत पाटील यांनी व्यक्त केला. शरद पवार यांना पाठिंबा देणारा प्रत्येक वर्ग या बैठकीत सहभागी होईल, असेही पाटील यांनी स्पष्ट केले.

हेही वाचंलत का?

SCROLL FOR NEXT