Latest

सलमानच्या सिनेमादरम्यानचा ‘तो’ अपघात आणि त्यानंतर सहा महिन्यांसाठीचा ‘मेमरी लॉस’ ! दिशा पटनीने शेअर केला किस्सा

अमृता चौगुले

पुढारी ऑनलाईन डेस्क : तुमच्या- आमच्या दैनंदिन जीवनातील बरंचसं काम हे मेमरीवर आधारित असतं. पण समजा अचानक मेमरी गेली म्हणजे थोडक्यात स्मृतीभ्रंश झाला तर ? आणि थोडका नाही तर जवळपास सहा महिन्यासाठी तर ? अभिनेत्री दिशा पाटनीसोबत असंच काहीसं झालं. एका अपघातामुळे दिशाचा जवळपास सहा महिने मेमरी लॉस झाला होता. ते सहा महिने दिशाला मागच्या काहीच गोष्टी आठवत नव्हत्या. याशिवाय रोजच्या गोष्टी लक्षात ठेवणं हा तिच्यासाठी जणू टास्क होऊन बसला होता.

एका वृत्तपत्राशी बोलताना तिने हा किस्सा शेअर केला आहे. आपल्यापैकी अनेकांना माहिती असेलच की दिशा जिमिंग आणि उत्तम जिम्नॅस्टिकपटू आहे. या दोन्ही गोष्टी तिच्या रुटीनचा भाग आहेत. पण या एक्सरसाईज दरम्यान तिला अपघाताला सामोरं जावं लागलं. दिशा जिम्नॅस्टिकची प्रॅक्टिस करत असताना तिचं डोकं जमिनीवर आपटलं. या माराचा परिणाम म्हणून तिला पुढील सहा महिने मागील काहीच आठवत नव्हतं. विशेष म्हणजे ही घटना सलमानच्या 'भारत' या बिग बजेट सिनेमा दरम्यान घडली होती. या सिनेमात दिशा सर्कसमध्ये काम करत असलेल्या कलाकाराची भूमिका साकारत होती.  दिशा आता आगामी योद्धा आणि किक २ या सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येते आहे

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.