Latest

Belarus : रशिया व युक्रेनमध्ये चर्चा सुरू; पण दोन्हीही नेते आपल्या भूमिकेवर ठाम

backup backup

पुढारी ऑनलाईन डेस्क : युक्रेनने बेलारूस (Belarus) सीमेवर रशियाशी चर्चा करण्याची सहमती दर्शवली आहे. संयुक्त राष्ट्र संघाच्या आपातकालीन बैठकीत रशिया आणि युक्रेन यांच्यात चर्चेतून तोडगा काढण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. पण, युक्रेनच्या परराष्ट्रमंत्री दिमित्री कुलेबा यांनी स्पष्ट सांगितलं आहे की, "आम्ही आत्मसमर्पण करणार नाही किंवा एक इंचाचीही जमीन रशियाला सोडणार नाही."

चर्चा सुरू होण्यापूर्वी परराष्ट्रमंत्री कुलेबा म्हणाले की, "आम्ही आत्मसमर्पण करणार नाही आणि आमची एक इचं जमीनही सोडणार नाही." रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतीन म्हणाले की, "मी संरक्षण मंत्री आणि लष्कर प्रमुखांना, तसेच इतर स्पेशल फोर्सना युद्धात विशिष्ट वळण घेण्याचा आदेश देत आहे", असं सांगत त्यांनी पश्चिमेकडील देशांवर रशियाविरोधात पाऊल उचलल्याचा आरोप केला आहे.

दरम्यान, युक्रेनचे राष्ट्रपती वोलोदिमिर झेलेन्स्की आणि बेलारूसचे (Belarus) नेते अजेक्झांडर लुकाशेंको यांच्या फोनवर संवाद झाला. त्यात म्हणाले की, "मी असल्या चर्चात्मक बैठकींवर विश्वास ठेवत नाही. तरीही त्यांना प्रयत्न करू दे. जेणे करून नंतर युक्रेनच्या नागरिकांच्या मनात एकही शंका शिल्लक राहणार नाही की, मी राष्ट्रपतीच्या पदावर असताना युद्ध रोखण्यासाठी कोणताच प्रयत्न केला नाही."

झेलेन्स्कींच्या हत्येचा रशियाचा प्लॅन फसला

युक्रेनने रशियाला जबरदस्त धक्का दिला आहे. रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतीन यांनी युक्रेनचे राष्ट्रपती वोलोडिमिर झेलेन्स्की यांच्या हत्येसाठी बर्बर चेचेन स्पेशल फोर्सची मोठी तुकडी पाठवलेली होती. मात्र, युक्रेनने या संपूर्ण फोर्सचाच खात्मा केला आहे, असं वृत्त डेली मेलने दिलं आहे.

बर्बर चेचेन स्पेशल फोर्सची तुकडी ही खूप क्रूर आणि हिंसाचारी आहे. त्याचबरोबर मानवी हक्कांच्या उल्लंघनासाठी कुप्रसिद्ध आहे. कीव्हच्या ईशान्यकडील हाॅस्टोमेलजवळ त्याच्या ५६ रणगाड्यांचा ताफा युक्रेनच्या क्षेपणास्त्राने उडविण्यात आला असल्याची माहिती समोर आली आहे. असे असले तरी या फोर्समधील किती सैनिक मारले गेले, याची माहिती समोर आलेली नाही.परंतु संख्या शेकडोंमध्ये असण्याची शक्यता आहे.

युक्रेनच्या क्षेपणास्त्र हल्ल्यात ज्यांचा मृत्यू झाला आहे, त्यामध्ये चेचन जनरल मॅगोमेद तुशैव यांचंही नाव असल्याचे समोर आलेले आहे. तुशैवला फोटोमध्ये कादिरोवसोबत दाखविण्यात आलं होतं. हे खूप महत्त्वाचं आहे. कारण, कादिरोव समलिंगी पुरुषांचा छळ करून त्यांना मारण्याच्या कामात प्रसिद्ध आहे. कादिरोवने त्याच्या मृत्यूच्या आदल्या दिवशी युक्रेनियच्या जंगलात स्क्वाड्रनला भेट दिली होती, असं सांगितलं जातं.

पाहा व्हिडिओ : रशिया-युक्रेन युद्ध; पुढे काय होणार?

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT