Latest

Sangli Banner : भाजप नेत्यांवर ईडी कारवाई दाखवा, एक लाख रुपये मिळवा; जतमधील डिजिटल बॅनरची चर्चा

backup backup

जत; पुढारी वृत्तसेवा : भाजप नेत्यांवर ईडी कारवाई दाखवा, एक लाख रुपये मिळवा असा फलक जत बसस्थानकासमोर लावण्यात आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांना ईडीची नोटीस आल्याच्या निषेधार्थ युवक राष्ट्रवादी काँग्रेसने हा फलक लावला आहे.

चार दिवसापूर्वी आमदार पाटील यांना चौकशीसाठी हजर राहण्याची नोटीस ईडीकडून देण्यात आली आहे. चौकशीसाठी हजर राहण्यास दहा दिवसांची मुदत आमदार पाटील यांनी मागितली आहे. याच डिजिटल फलकाची चर्चा जिल्हाभर सुरू आहे.

माजी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांना ईडीने नोटीस बजावली आहे. याच पार्श्वभूमीवर शनिवारी (दि. १४) रात्री जतमध्ये बसस्थानकासमोर डिजीटल फलक लावण्यात आला आहे. राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्यावतीने हा फलक लावण्यात आला असून यामुळे राजकीय क्षेत्रात खळबळ माजली आहे. रविवारी (दि. १४) दिवसभर मात्र भाजपच्या कार्यकर्त्यांनी या फलकबाजीवर प्रतिक्रिया देण्यास टाळले होते.

सोशल मीडियावर या फलकाचा धुमाकूळ

माजी मंत्री जयंत पाटील यांच्या समर्थनार्थ राष्ट्रवादीच्या युवा कार्यकर्त्यांनी जत तालुक्यातील कार्यकर्त्यांनी फेसबुक व्हाट्सअप स्टेटस वर असे फलक टाकून भावना व्यक्त केले आहेत दिवसभर या फलकाची व सोशल मीडियावर नेटकऱ्याच्यात चर्चा सुरू होती. याबाबत मिमिक्री, विनोद सुद्धा सुरू आहेत. ईडीची भीती प्रत्येक विरोधी बाकावरील नेत्यांना आहे मात्र भाजपला का नाही असा सवाल नेटकऱ्यानी केला आहे.

SCROLL FOR NEXT