Latest

Dharmendra : अभिनेते धर्मेंद्र यांना डिस्चार्ज म्हणाले,”मित्रांनो मी धडा शिकलो…”

मोनिका क्षीरसागर

पुढारी ऑनलाईन : बॉलीवूडचे ज्‍येष्‍ठ अभिनेते धर्मेंद्र ( Dharmendra)  यांची काही दिवसापूर्वी प्रकृती बिघडली हाेती. त्यांना ब्रीच कॅंडी रूग्णालयात दाखल करण्यात आले. गेले चार दिवस त्यांच्यावर येथे उपचार सुरू होते. त्याची प्रकृती बरी झाल्यानंतर त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. यानंतर बॉलीवूड अभिनेते धर्मेंद्र यांनी त्याच्या ट्विटर अकाऊंटवरून आपल्या चाहत्यांशी संवाद साधत एक महत्त्‍वाचा संदेशही दिला आहे.

Dharmendra : कोणतीही गोष्टीचा अतिरेक करू नका

अभिनेते धर्मेंद्र यांनी त्यांच्या ट्विटरवर शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये म्हटले आहे की, मित्रांनो कोणतीही गोष्टीचा अतिरेक करू नका. मी ही चूक केली आणि मला त्रास झाला. त्यामुळे मित्रांनो, " मी धडा शिकलो आहे ?" असे म्हणत धर्मेंद्र यांनी आपल्या चाहत्यांना कोणतीही गोष्ट जपून करण्याचा सल्लाही दिलाय.

धर्मेंद्र यांना पाठीच्या कण्याला दुखापत झाली होती. त्यामुळे त्यांच्या पाठीच्या मांसपेशी ताणल्या गेल्या होत्या. म्हणून त्यांना ब्रीच कॅंडी रूग्णालयात दाखलकेले होते; पण मी आता ठीक असल्याचेही धर्मेंद्र यांनी म्‍हटलं आहे.

हेही वाचलत का ?

पाहा व्‍हिडीओ :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT