Latest

तेलंगणाचे पोलीस महासंचालक अंजनी कुमार निलंबित, आचारसंहिता भंग प्रकरणी निवडणूक आयोगाची कारवाई

नंदू लटके

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : तेलंगणाचे पोलीस महासंचालक अंजनी कुमार यांना आदर्श आचारसंहिता नियमांचे उल्‍लंघन केल्‍याप्रकरणी निलंबित केले आहे. ही कारवाई केंद्रीय निवडणूक आयोगाने केली असल्‍याचे वृत्त 'एएनआय'ने दिले आहे.

तेलंगणाचे पोलीस प्रमुख अंजनी कुमार यांच्यासह  राज्य पोलीस नोडल अधिकारी संजय जैन यांनी निकाल जाहीर होण्यापूर्वी तेलंगणा विधानसभा निवडणुकीतील काँग्रेसचे स्टार प्रचारक आणि उमेदवार रेवंत रेड्डी यांची भेट घेतली होती. 'एएनआय'ने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये वरिष्ठ पोलीस अधिकारी रेड्डी यांना पुष्पगुच्छ देऊन अभिवादन करताना दिसले.

दक्षिणेकडील राज्यात पहिले सरकार स्थापन करण्यासाठी काँग्रेस तेलंगणामध्ये साध्या बहुमताच्या दिशेने वाटचाल करत आहे. तेलंगणामध्‍ये काँग्रेसची वाटचाल ही निर्णायक बहुमताकडे असून ६४ जागांवर आघाडीवर आहे. सरकार स्थापन करण्यासाठी बहुमताचा आकडा ६० जागांचा आहे.

हेही वाचा : 

SCROLL FOR NEXT