Latest

सोळा गुन्हे दाखल असलेला धुमाळला पुन्हा बेड्या

अमृता चौगुले

पुणे:  पुढारी वृत्तसेवा: पुणे शहर व ग्रामीण परिसरात जबरी चोरी, दरोडा व मोक्का सारखे गुन्हे दाखल असलेल्या सराईतला मोक्काच्या गुन्ह्यातून बाहेर आल्यानंतर पिस्तुल बाळगल्याप्रकरणी पुन्हा बेड्या ठोकल्या. गुन्हे शाखेच्या युनिट 2 ने ही अटक केली. हेमंत उर्फ बबलु प्रताप धुमाळ (26, रा. सांगवी, ता. बारामती, जि. पुणे) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे.  29 जून रोजी पोलिस उपनिरीक्षक नितीन कांबळे हे त्यांच्या कर्मचार्‍यांसोबत पेट्रोलिंग करत असताना त्यांना बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, पुरंदर कॉम्प्लेक्स शेजारील भिंतीलगत असलेल्या कॅनाल शेजारी स्वारगेट येथे थांबला असून त्याच्याकडे पिस्तुल असल्याचे समजले.

त्यानुसार स्वारगेट येथील पुरंदर कॉम्प्लेक्स शेजारी भिंतीलगत एक जण थांबलेला असल्याचे दिसले. त्याला ताब्यात घेण्यात आले असता त्याच्याजवळून एका देशी बनावटीचे पिस्तुल आणि एक जिवंत काडतूस जप्त करण्यात आले. तपासात त्याच्यावर शहर आणि ग्रामीण हद्दील सोळा गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली. त्याला नुकताच मोक्काच्या गुन्ह्यातून जामीनावर सोडण्यात आले होते. पोलिस निरीक्षक क्रांतीकुमार पाटील, सहायक निरीक्षक वैशाली भोसले यांच्या पथकाने ही कारवाई केली.

SCROLL FOR NEXT