Latest

धुळे : चिमुरडीवर अत्याचार करणारा नराधम गजाआड

backup backup

धुळे, पुढारी वृत्तसेवा : धुळ्यात अवघ्या सहा वर्षे वयाच्या चिमुकलीवर ५६ वर्षाच्या वृद्धाने अतिप्रसंग केल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी नराधमास देवपूर पोलिसांनी गजाआड केले आहे. देवपुर भागांमध्ये भाडेतत्त्वावर राहणाऱ्या बळवंत पाटील (वय ५६) या नराधमाने चिमुकलीला खाऊचे आमिष दाखवून घरात बोलवले. नंतर तिच्यावर अतिप्रसंग केला.

घडलेला प्रकार पीडित चिमुकलीने तिच्या आजीला सांगितला. त्यानंतर पीडितेच्या परिवाराने देवपुर पोलिस ठाणे गाठून तक्रार दिली. त्यानुसार पोलिसांनी तातडीने हालचाली करीत या नराधमाला ताब्यात घेतले आहे. यासंदर्भात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान या पीडित त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले असून तिची प्रकृती स्थिर असल्याची माहिती पोलिस प्रशासनाने दिली आहे.

हेही वाचलतं का?

SCROLL FOR NEXT