Latest

Go First Flight : ‘गो फर्स्ट’ला हवाई वाहतूक सुरू करण्याची मिळाली परवानगी

रणजित गायकवाड

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : आर्थिक दिवाळखोरी जाहीर केलेल्या गो फर्स्ट एअरलाईन्सला (Go First Flight) काही अटींवर हवाई सेवा सुरू करण्याची परवानगी हवाई वाहतूक महासंचालनालयाने (डीजीसीए) दिली आहे. गेल्या 3 मे रोजी गो फर्स्टला आपली हवाई सेवा बंद करावी लागली होती.

दिल्ली उच्च न्यायालय तसेच एनसीएलटी समोर सुरु असलेल्या खटल्यांच्या निकालाच्या अधीन राहून गो फर्स्टला (Go First Flight) काही मार्गांवर विमान सेवा सुरू करण्यास परवानगी दिली जात असल्याचे डीजीसीएकडून सांगण्यात आले. विमान सेवा सुरू करण्यापूर्वी कंपनीला सर्व नियामक परवाने घ्यावे लागतील. डीजीसीएकडून परवाना मिळाल्यानंतर गो फर्स्टला तिकिटांची विक्री सुरू करता येईल.

SCROLL FOR NEXT