Latest

वजन वाढले तरी मधुमेहग्रस्तांसाठी मृत्यूची जोखीम असते कमीच!

Arun Patil

लंडन : एका नव्या संशोधनात असे दिसून आले आहे की जर 65 वर्षांपेक्षा अधिक वयाच्या लोकांचे वजन थोडे वाढले तरी हृदयविकाराने त्यांचा मृत्यू होण्याचा धोका अधिक नसतो. 'टाईप-2' मधुमेहाने ग्रस्त असलेल्या लोकांना नेहमी वजन नियंत्रणात ठेवण्याचा सल्ला दिला जात असतो. मात्र या नव्या संशोधनानुसार अशा लोकांचे वजन थोडे वाढले तरी तितकी जोखीम नसते.

युके बायोबँकेच्या आरोग्य डेटावर आधारीत याबाबतचे निष्कर्ष काढण्यात आले आहेत. त्यानुसार 65 किंवा त्यापेक्षा कमी वयाच्या लोकांसाठी 23-25 च्या सामान्य सीमेअंतर्गत बॉडी मास इंडेक्स (बीएमआय) टिकवणे हृदयविकाराने मृत्यू येण्याच्या सर्वात कमी जोखिमशी निगडित आहे. मात्र 65 वर्षांपेक्षा अधिक वयाच्या लोकांसाठी, 25-26 च्या बीएमआयसह थोडे वजन वाढल्याने जोखीम जास्त वाढत नाही.

चीनच्या जियानयांग सेंट्रल हॉस्पिटलचे डॉ. शाओयोंग जू यांनी सांगितले की या संशोधनात आढळले की टाईप-2 मधुमेह असलेल्या लोकांसाठी ऑप्टिमल बीएमआय कार्डियो-मेटाबोलिक रिस्क फॅक्टर वयानुसार वेगळा असतो. वृद्ध व्यक्तींबाबत, ज्यांचे वजन सामान्यापेक्षा अधिक आहे, मात्र जे 'लठ्ठ' नाहीत, त्यांच्यासाठी वजन कमी करण्याऐवजी ते नियंत्रित ठेवणे हा व्यावहारिक उपाय असू शकतो.

SCROLL FOR NEXT