Latest

#SupertechTwinTowers दिल्लीतील ट्विन टॉवर पाडल्यानंतरच स्वप्नपूर्ती!

दिनेश चोरगे

नवी दिल्ली; वृत्तसंस्था :  दिल्ली एनसीआरच्या नोएडा भागातील ट्विन टॉवरची सध्या जोरदार चर्चा आहे; कारण कुतूबमिनारहून अधिक उंचीचे जुळे टॉवर रविवारी दुपारी अडीचच्या सुमारास जमीनदोस्त केले जातील. त्याहून अधिक चर्चा नियोजित 'ब्लास्टर' चेतन दत्ता यांची आहे. #SupertechTwinTowers

इमारतविषयक नियमावलीचे उल्लंघन करून ही जुळी टॉवर बांधण्यात आल्याचे  न्यायालयात सिद्ध झाले आहे. त्यामुळे 40 मजल्यांच्या या दोन्ही इमारती पाडल्या जातील. या इमारती पाडण्याची जबाबदारी असलेल्या कंपनीतील 49 वर्षीय चेतन दत्ता हे या इमारती पाडण्याचे काम देण्यात आलेल्या एडिफिस इंजिनिअरिंग कंपनीत 'ब्लास्टर' म्हणून नोकरीला आहेत.

चेतन दत्ता हे स्फोटक यंत्रणेचे व्यवस्थापक आहेत. सर्वोच्च न्यायालयाचा इमारतींबाबतचा निकाल येताच मी देवाकडे प्रार्थना केली होती की, या इमारती पाडण्याची संधी मला मिळावी, असे चेतन दत्ता सांगतात. अत्यंत काळजीपूर्वक इमारत पाडण्यासाठी गेल्या 10 दिवसांत दोन्ही इमारतींवर आम्ही स्फोटके लावलेली आहेत. आता केव्हा एकदा धडाम आवाज होतो आणि या इमारती कोसळतात, असे मला झाले आहे, असे चेतन दत्तांचे म्हणणे आहे.

3,700 किलो स्फोटके पेरली

– ट्विन टॉवरचे काऊंटडाऊन सुरू झाले आहे. 28 ऑगस्ट 2022 रोजी दुपारी 2.30 वाजताच एक बटण दाबले जाईल. पुढच्या 12 सेकंदात काही स्फोट होतील आणि नोएडातील या दोन इमारती जमीनदोस्त होतील. त्यासाठी तयारीला मात्र 181 दिवस लागले आहेत.

SCROLL FOR NEXT