Latest

Nora Fatehi Clean Chit : सुकेश चंद्रशेखरनच्या प्रकरणात नोरा फतेहीला दिल्ली पोलिसांनी दिली क्लीन चिट

अमृता चौगुले

दिल्ली; पुढारी ऑनलाईन : चौकशीच्या एका दिवसानंतर दिल्ली पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने (EOW) अभिनेत्री नोरा फतेहीला (Nora Fatehi Clean Chit) २०० कोटींच्या घोटाळ्यात क्लीन चिट दिली आहे, असा दावा अभिनेत्री नोरा फतेहीच्या टीमने शुक्रवारी एका निवेदनाद्वारे केला. टीमच्या म्हणण्यानुसार, दिल्ली पोलिसांनी सांगितले की, 'अभिनेत्री नोरा फतेही आरोपी सुकेश चंद्रशेखरच्या कटात सामील नव्हती आणि तिला या गुन्हेगारी सिंडिकेटची माहिती नव्हती.'

बॉलीवूड अभिनेत्री नोरा फतेहीची (Nora Fatehi Clean Chit) गुरुवारी दिल्ली पोलिसांनी सुकेश चंद्रशेखरच्या खंडणी प्रकरणात सहा तासांपेक्षा अधिक काळ चौकशी करण्यात आली होती. याच प्रकरणात अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसची जवळपास आठ तास चौकशी करण्यात आल्यानंतर नोराची चौकशी करण्यात आली होती.

नोराच्या टीमने सांगितले की, सुकेश चंद्रशेखरच्या या प्रकराबाबत नोरा (Nora Fatehi Clean Chit) अनभिज्ञ होती. या प्रकरणात ती एक जबाबदार साक्षीदार म्हणून पोलिसांना मदत व सहकार्य करत आहे. नोराच्या टीमने दिलेल्या माहितीनुसार, ईओडब्ल्युच्या प्रवक्त्यांनी सांगितले की, "नोराला या गुन्हेगारी सिंडिकेटबद्दल माहिती नव्हती. नोराच्या माहितीच्या आधारे आम्ही तपासात पुढे जाऊ. तपास अद्याप सुरू आहे आणि आम्ही सर्व विधाने, परिस्थिती आणि पुरावे विचारात घेऊन अंतिम निष्कर्षापर्यंत पोहोचू."

सुकेश चंद्रशेखर याच्या पत्नीचा चेन्नईमध्ये स्टुडिओ आहे. नोराला कामानिमित्त तेथे बोलवण्यात आले होते. तेव्हा तिला फी आकारू नका असे सांगितले. तसेच त्याऐवजी तिला सुकेशकडून कार भेट देण्यात येईल असे सांगितले गेले होते. जेव्हा सुकेशने नोराला वारंवार फोन केले त्यानंतर तिचा फोन ब्लॉक केला गेला तेव्हा या बाबत नोराला संशय आला होता. नोराने सुकेश सोबतच्या व्यवहारात पूर्णपणे व्यावसायिकता बाळगली होती.

गुरुवारी नोरा फतेहीची ईओडब्ल्युच्या कार्यालायत चौकशी केली. यावेळी नोराने तिच्या जवळ असणारे सर्व पुरावे ईओडब्ल्युकडे सादर केले. ज्यामध्ये संभाषण व मॅसेजेसचे स्क्रीन शॉट्स आहेत. साक्षीदाराची साक्ष व पुराव्यांच्या आधारे हा खटला पुढे चालवला जाणार आहे.

सुकेशने दिली बीएमडब्लू भेट 

सुकेशने नोराच्या बहिणीच्या नवऱ्याला बीएमडब्लू भेट दिली होती. नोरा फतेहीने अधिकाऱ्यांना सांगितले की, ती कधीही सुकेश किंवा पिंकीला भेटली नाही. सूत्रांनी सांगितले की, तिने ईओडब्ल्यू अधिकाऱ्यांना सांगितले की ती व्हॉट्सअॅपद्वारे सुकेश चंद्रशेखरच्या संपर्कात होती. दरम्यान, नोराच्या बहिणीचा नवरा बॉबीने कबूल केले आहे की सुकेश चंद्रशेखरने त्याला 65 लाख रुपयांची बीएमडब्ल्यू गिफ्ट केली होती.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT