Latest

Delhi Murder Case | दिल्लीतील साक्षी खून प्रकरणातील आरोपी साहिलला ३ दिवसांची पोलिस कोठडी

मोनिका क्षीरसागर

पुढारी ऑनलाईन: दिल्लीतील १६ वर्षीय साक्षी खून प्रकरणातील आरोपी साहिल याला दिल्ली पोलिसांकडून आज (दि.०१मे) कोर्टात हजर करण्यात आले. दरम्यान कोर्टाने आरोपी साहिल याला तीन दिवसांची पोलिस कोठडी (Delhi Murder Case) सुनावली आहे, अशी माहिती ऑर्थर नॉर्थचे डीसीपी रवीकुमार सिंग यांनी दिली आहे.

साहिल सर्फराज खान आणि साक्षी जून 2021 पासून मित्र होते. त्यानंतर साक्षी साहिलला टाळू लागली. ती दुसर्‍याच्या प्रेमात पडल्याचा संशय साहिलला येऊ लागला. काही दिवसांपूर्वीच त्याने साक्षीला ठार मारण्याची धमकी दिली होती. साक्षीने तिच्याकडून साहिलसोबत ब्रेकअप केला होता; पण साहिल तिचा पिछा सोडत नव्हता. शनिवारीही दोघांमध्ये वाद झाला. रविवारी साहिलने साक्षीला संपविले. (Delhi Murder Case)

साक्षीची हत्या केल्यानंतर साहिल बुलंद शहर जिल्ह्यातील रिठाळा या गावी त्याच्या आत्याच्या घरी दडून बसला होता. स्वत:चा फोनही त्याने बंद करून ठेवला होता. साहिल इथे आलेला आहे म्हणून आत्याने भावाला (साहिलचे वडील सर्फराज यांना) फोन केला. सर्फराज यांचा फोन पोलिसांनी ट्रॅकवर लावून ठेवलेला होता. साहिल कुठे आहे, हे पोलिसांना या कॉलने कळले. (Delhi Crime News) यानंतर पोलिसांनी साहिल याला ताब्यात घेतले. आज कोर्टात हजर करण्यात आल्यानंतर त्याला कोर्टाने तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.

हेही वाचा:

SCROLL FOR NEXT