पुढारी ऑनलाईन डेस्क: दिल्लीचे माजी उपमुख्यमंत्री आणि आप नेते मनीष सिसोदिया (Manish Sisodia) यांची न्यायालयीन कोठडी पुन्हा एकदा वाढवण्यात आली आहे. दिल्लीतील राऊस एव्हेन्यू कोर्टाने मंगळवारी (दि.७ मे) सिसोदिया यांच्या कोठडी बुधवार १५ मे पर्यंत वाढवली आहे. या संदर्भातील वृत्त एएनआयने दिले आहे.
दिल्ली दारू धोरणातील कथित घोटाळ्याशी संबंधित केंद्रीय अन्वेषण ब्यूरोने (CBI) दाखल केलेल्या खटल्यात मनीष सिसोदिया (Manish Sisodia) यांची कोठडी न्यायालयाने बुधवार १५ मे पर्यंत वाढवली आहे. खटल्यातील आरोप निश्चित करण्याबाबत पुढील युक्तिवादासाठी न्यायालयाने १५ मे ही तारीख निश्चित केली आहे, असे देखील वृत्तात म्हटले आहे.
दिल्लीचे माजी मुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांना केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) २६ फेब्रुवारी २०२३ रोजी मद्य गैरव्यवहार प्रकरणाशी संबंधित आरोपावरून अटक केली आहे. या प्रकरणात अंमलबजावणी संचलनालयाने (ईडी) ९ मार्च २०२३ रोजी सिसोदियांवर कारवाई केली होती. तेव्हापासून सिसोदिया तिहार तुरुंगात असून जामीनासाठी प्रयत्न करत आहेत. परंतु त्यांना अद्याप जामीन मिळालेला नाही.
हेही वाचा: