Latest

श्रद्धा वालकर हत्या प्रकरणी उच्‍च न्‍यायालयाचा मोठा निर्णय, “आरोपपत्रातील मजकूर..”

नंदू लटके

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : श्रद्धा वालकर हत्या प्रकरणी आज ( दि. १९ ) दिल्‍ली उच्‍च न्‍यायालयाने मोठा निर्णय दिला आहे. या प्रकरणी दाखल आरोपपत्रातील मजकूर दाखवण्‍यास किंवा त्‍याची माहिती देण्‍यास सर्व वृत्तवाहिन्‍यांना न्‍यायालयाने मनाई केली आहे.

श्रद्धा वालकर हत्या प्रकरणी दिल्‍ली पोलिसांनी दाखल केलेल्‍या आरोपपत्रातील गोपनीय माहिती प्रकाशित करणे, छापणे आणि प्रसारित करणे तसेच या प्रकरणाच्या तपासादरम्यान गोळा केलेली इतर सामग्री प्रसारित करण्यापासून प्रसिद्‍धी माध्‍यमांना प्रतिबंधित करावी, अशी मागणी करणारी याचिका दिल्‍ली पोलिसांनी दाखल केली होती. यावर न्‍यायमूर्ती रजनीश भटनागर यांच्‍या खंडपीठासमोर सुनावणी झाली.

या प्रकरणाचा निकाल लागेपर्यंत सर्व वृत्तवाहिनींनी श्रद्धा वालकर खून प्रकरणाचे आरोपपत्रातील मजकूर प्रदर्शित करु नये  किंवा दाखवू नये, असे निर्देश न्‍यायमूर्ती रजनीश भटनागर यांनी केंद्र सरकारला दिले आहेत.

SCROLL FOR NEXT