Latest

दिल्ली मद्य घोटाळा : केजरीवालांना ‘ईडी’चे पाचवे समन्‍स

नंदू लटके

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : दिल्ली मद्य घोटाळा प्रकरणी सक्‍तवसुली संचालनालयाने (ईडी) आज (दि.३१) दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आपचे राष्ट्रीय निमंत्रक अरविंद केजरीवाल पुन्‍हा एकदा समन्‍स बजावले. या प्रकरणी केजरीवालांसाठीचे हे पाचवे समन्‍स आहे. 2 फेब्रुवारी रोजी चौकशीसाठी हजर राहावे, असे आदेश त्‍यांना देण्‍यात आले आहेत. दरम्‍यान, केजरीवाल यांनी हा सर्व प्रकार राजकीय षड्‍यंत्र सुरु आहे, असा आरोप केला आहे.

दिल्ली मद्य घोटाळा प्रकरणी यापूर्वी 'ईडी'ने 17 जानेवारी, 3 जानेवारी, 21 डिसेंबर आणि 2 नोव्हेंबर रोजी केजरीवाल यांना समन्स पाठवले होते; परंतु केजरीवाल प्रत्‍येकवेळी गैरहजर राहिले आहेत

यापूर्वी ईडीने पाठवलेल्या समन्सबाबत अरविंद केजरीवाल यांनी आरोप केला होता की, राजकीय कटाचा भाग म्हणून त्यांना समन्स पाठवले जात आहेत. तथाकथित अबकारी प्रकरणाचा तपास गेल्या दोन वर्षांपासून सुरू आहे. या दोन वर्षांत त्यांना काहीच मिळाले नाही. किती पैसे वसूल झाले, सोने किंवा जमिनीची कागदपत्रे कुठेही सापडली का, असे अनेक प्रश्नही अनेक न्यायालयाने ईडीला विचारले आहेत, पण ईडीला कुठेही काहीही सापडलेले नाही. भाजपला स्वतःच्या कामावर नव्हे तर सीबीआय-ईडीचा वापर करून निवडणुका जिंकायच्या आहेत, असा आरोपही त्‍यांनी केला होता.

SCROLL FOR NEXT