Latest

Delhi Crime : ’70 हजारात खरेदी केलेल्या ‘बायको’चा खून; मृतदेह जंगलात फेकला; आरोपी नवऱ्यासह तिघांना अटक

backup backup

पुढारी ऑनलाइन डेस्क : Delhi Crime : देशाची राजधानी दिल्ली पुन्हा एकदा महिलेच्या निर्घृण खूनामुळे हादरली आहे. दिल्ली-हरियाणा सीमेवरील जंगलात एका महिलेचा मृतदेह आढळला. या खूनाचा तपास करताना धक्कादायक माहिती समोर आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी तिघांना अटक केली आहे. आरोपींपैकी एक जण या महिलेचा नवरा आहे. धक्कादायक बाब अशी की आरोपी नवऱ्याने बायकोच्या कथित नातेवाईक महिलेला 70,000 रुपये देऊन तिला लग्नासाठी खरेदी केले होते.

दिल्ली पोलिसांना अनोळखी मृतदेहाचा कॉल

दिल्ली पोलिसांना पीसीआरवर शनिवारी (दि 5) अनोळखी महिलेचा मृतदेह आढळल्याचा कॉल पोलिसांना आला. हा मृतदेह दक्षिण दिल्लीच्या हरियाणा सीमेजवळ झील खूर्द येथे आढळला होता. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. घटनास्थळी पोहोचल्यावर त्यांना 30 वर्षीय महिलेचा मृतदेह आढळला होता. मृतदेहाची ओळख पटवणे अवघड होते. पोलिसांनी अज्ञातांवर गुन्हा दाखल करून तपास सुरू केला.

Delhi Crime : पोलिसांनी असा लावला गुन्ह्याचा छडा

दक्षिण दिल्लीचे पोलिस उपायुक्त चंदन चौधरी यांनी गुन्ह्याची उकल कशी केली याबाबत माहिती दिली. त्यांनी सांगितले की, तांत्रिक आणि मॅन्यअल पाळत ठेवून पोलिसांनी शनिवारी (दि 5) सकाळी 1.40 च्या सुमारास मृतदेह टाकलेल्या ठिकाणाजवळ एका ऑटोरिक्षाच्या हालचालीचा मागोवा घेतला. या वाहनाचा मार्ग शोधत त्यांनी रिक्षाचालक अरुण (रा.छतरपूर) याला ओळखले. त्याला गडाईपूर बंद रोडजवळ पकडण्यात आले.

Delhi Crime : पोलिसी खाक्या दाखवताच अरुणने दिली गुन्ह्याची कबुली

अरुणला ताब्यात घेऊन पोलिसांनी त्याची कसून चौकशी केली. पोलिसी खाक्या दाखवताच अरुणने गुन्ह्याची कबुली देत सर्व प्रकरण सांगितले. अरुणने मृताची ओळख स्वीटी अशी सांगितली. स्वीटी ही त्याचा मेहुणा धरमवीरची पत्नी आहे. कबुली जबाबमध्ये अरुण पुढे म्हणाला, त्याने धरमवीर आणि त्याचा नातेवाईक सत्यवान यांच्यासोबत हरियाणा सीमेजवळ स्विटीची गळा आवळून हत्या केली आणि तिचा मृतदेह जंगलात फेकून दिला," असे अधिकाऱ्याने सांगितले.

अरुणने दिलेल्या माहितीवरून पोलिसांनी धर्मवीर आणि सत्यवान दोघांना अटक केली. धरमवीर एका कारखान्यात काम करतो. तर अरुण रिक्षाचालक आहे आणि सत्यवान वाहन वर्कशॉपमध्ये कर्मचारी आहे. गेल्या काही महिन्यांपासून धरमवीरला स्वीटीचे वर्तन आवडत नव्हते. ती त्याला आणि नातेवाईकांना काहीही न सांगता अनेक महिने घरातून निघून जात असे. त्यामुळे धर्मवीरच्या डोक्यात स्वीटीबाबत राग होता.

तिन्ही पैकी कोणत्याही आरोपीला स्विटीच्या पालकांबद्दल काहीही माहिती नाही. कारण पोलिओग्रस्त धर्मवीरने स्वीटीशी तिच्या एका कथित महिला नातेवाईकाला 70,000 रुपये मोजून लग्नासाठी खरेदी केले होते. तसेच स्वीटीने देखील तिच्या पालकांबद्दल किंवा कुटुंबाबद्दल कोणताही तपशील कधीही दिला नव्हता. त्यामुळे स्वीटीच्या पालकांबाबत कोणतीही माहिती तिघांकडे नव्हती. स्वीटीने फक्त ती पाटणाची असल्याचे सांगितले होते, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली.

Delhi Crime : स्वीटीचा खून आणि मृतदेहाची विल्हेवाट

स्वीटीच्या नेहमी न सांगता महिना-महिना गायब राहण्याने धर्मवीरला राग होता. त्यामुळे धर्मवीर आणि अरुणने तिच्या खुनाचा कट रचला. यासाठी त्यांनी त्यांचा नातेवाईक सत्यवान याची देखील मदत घेतली. हत्येच्या दिवशी तिघेही महिलेला रेल्वे स्टेशनवर सोडण्याच्या बहाण्याने सोबत आले. त्यांनी तिला हरियाणा सीमेजवळ नेले आणि तिचा गळा दाबून खून केला, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. अरुणनेही पोलिसांना सांगितले की, आपल्याला या भागातील स्थलांतराची माहिती होती. त्यामुळे त्याने मृतदेहाच्या विल्हेवाटीसाठी वनक्षेत्र निवडले.

तिघांवर गुन्हा दाखल

पोलिसांनी आरोपी अरूण, धर्मवीर आणि सत्यवान तिघांवर कलम 302 (हत्या), 201 (गुन्ह्याचा पुरावा गायब करणे किंवा स्क्रीन गुन्हेगाराला खोटी माहिती देणे) आणि आयपीसीच्या 34 (सामान्य हेतू) अंतर्गत तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हे ही वाचा :

SCROLL FOR NEXT