Latest

Deepika Padukone Bikini Controversy : भगव्या बिकिनीवरुन शर्लिन चोप्रा दीपिकावर भडकली; म्हणाली ‘ती तुकडे तुकडे गँगची समर्थक’

अमृता चौगुले

पुढारी ऑनलाईन डेस्क : बॉलीवूड जगतात सध्या जर कोण सर्वात जास्त चर्चेत असेल तर ती म्हणजे दीपिका पदुकोण(Deepika Padukone). 'पठाण' (Pathaan) चित्रपटातील 'बेशरम रंग' (Besharam Rang)या पहिल्या गाण्यातील त्याच्या लूकचा वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. या गाण्यात तिने परिधान केलेल्या भगव्या रंगाच्या बिकिनीमुळे देशात सर्वत्र गदारोळ माजला आहे. मध्यप्रदेशचे गृहमंत्री डॉ. नरोत्तम मिश्रा (Dr. Narottam Mishra) यांनी गाण्यात दीपिकाने घातलेल्या भगव्या बिकिनीवर आक्षेप नोंदवला होता. आता या वादात बोल्ड अभिनेत्री शर्लिन चोप्राने (Sherlyn Chopra) उडी घेत या गाण्यातील दीपिकाचा लूक चुकीचा असल्याचे म्हणाली आहे. (Deepika Padukone Bikini Controversy)

बॉयकॉट पठाण ट्रेंड (Deepika Padukone Bikini Controversy)

शर्लिनच्या म्हणण्यानुसार हे सहनशीलतेच्या बाहेर असल्याचे म्हटले आहे. 'पठाण' चित्रपटातील 'बेशरम रंग' या गाण्यात दीपिका भगव्या रंगाच्या बिकिनीमध्ये दिसली आणि ती नव्या वादाचे कारण बनली आहे. यानंतर आता 'बॉयकॉट पठाण' पुन्हा ट्रेंड सुरू झाला आहे.

दीपिका 'तुकडे टुकडे गँग'ची सदस्य

शाहरुख खान आणि दीपिका पदुकोण यांच्या पठाण चित्रपटातील बेशरम रंग या गाण्यावर शर्लिन चोप्राने केलेले वक्तव्य सध्या चर्चेत आले आहे. बेशरम रंग गाण्यातील दीपिका पदुकोणच्या बिकिनीमुळे ती चांगलीच भडकली आहे. शर्लिन म्हणते, दीपिका तुकडे तुकडे गँगची समर्थक आहे. भगव्या रंगाची बिकिनी घालून दीपिकाने लाखो हिंदूंच्या भावना दुखावल्या आहेत.(Deepika Padukone Bikini Controversy)

शुद्धता, विश्वास आणि विश्वासाचा रंग

शर्लिन चोप्रा म्हणते, 'भगवा रंग हा भारताच्या कोट्यवधी लोकांच्या शुद्धता, विश्वास आणि आस्थेचा रंग आहे. अशा स्थितीत भगव्या रंगाची बिकिनी घातलेली दीपिकाला पाहणे सहन होत नाही. ती तुकडे तुकडे टोळीची समर्थक आहे. मी डॉ. नरोत्तम मिश्रा यांच्याशी पूर्णपणे सहमत आहे. शर्लिनच्या या विधानानंतर काही लोकांचे म्हणणे आहे की, ती स्वतः अनेकदा बोल्ड कपड्यांमध्ये दिसली आहे आणि दीपिकाला चुकीचे म्हणत आहे.

दीपिकाच्या भगव्या बिकिनीबद्दल डॉ. नरोत्तम मिश्रा म्हणाले की, जर या चित्रपटात बदल केला नाही तर मध्य प्रदेशात हा चित्रपट प्रदर्शित होऊ देणार नाही. हे गाणे डर्टी माइंडवरून बनवण्यात आल्याची टीका त्यांनी केली आहे.

शाहरुख म्हणतो 'मैं जिंदा हूँ'

दरम्यान, सोशल मीडियावर पठाण विरोधात सुरू असलेल्या ट्रोलिंगबाबत शाहरुख खानचे वक्तव्य सुद्धा चर्चेत आले आहे. सोशल मीडियाचा दृष्टीकोन अनेकदा संकुचित असतो, असे त्याने कोलकाता आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात सांगितले. जग काहीही असो, आपल्यासारखे लोक नेहमीच सकारात्मक राहतात. असे म्हणत 'मैं जिंदा हूँ' असे सुचक विधान त्याने यावेळी केले होते आणि ते सध्या सर्वत्र व्हायरल होत आहे.


अधिक वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT