Latest

Fighter motion Poster : दीपिका-ऋतिकचे मोशन पोस्टर रिलीज, ‘या’ तारखेला रिलीज होणार

स्वालिया न. शिकलगार

पुढारी ऑनलाईन डेस्क : बॉलीवूड अभिनेता ऋतिक रोशन अखेरीस २०२२ चा क्राईम-ड्रामा चित्रपट 'विक्रम वेधा' मध्ये दिसला होता. याच नावाचा तमिळ चित्रपटाचा हिंदी रीमेक होता. (Fighter motion Poster ) आता ऋतिक आगामी ॲक्शन चित्रपट 'फायटर' वरून चर्चेत आहे. चित्रपटाच्या घोषणेनंतर फॅन्सचा उत्साह अधिक आहे. (Fighter motion Poster ) ट्विटरवर या चित्रपटाचे मोशन पोस्टर जारी करण्यात आले आहे. (deepika padukone and hritik roshan)

सिद्धार्थ आनंद यांनी फायटरचे दिग्दर्शन केले आहे. याआधी ऋतिक रोशनने आपल्या ऑफिशियल इन्स्टाग्राम अकाऊंटवर आपला फर्स्ट लूक पोस्टर जारी केला होता. सोबतच रिलीज डेटची घोषणादेखील केली होती. फायटर नव्या वर्षात म्हणजेच २५ जानेवारी, २०२४ रोजी चित्रपटगृहात रिलीज होणार आहे.

'पठान' सारखा ब्लॉकबस्टर चित्रपट देणारे सिद्धार्थ आनंद यांचा हा पुढील चित्रपट असणार आहे. 'फायटर'मध्ये दीपिका पादुकोण, ऋतिक रोशनसोबत मुख्य भूमिकेत झळकणार आहे. या चित्रपटात अनिल कपूरची मुख्य भूमिका आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT