Latest

शिंदेंच्या शिवसेनेला जागावाटपात वाटा की घाटा? दीपक केसरकर काय म्हणाले?

स्वालिया न. शिकलगार

पुढारी ऑनलाईन डेस्क : बाळासाहेबांना अपेक्षित असलेले निर्णय पंतप्रधान मोदी यांनी पूर्ण केले. आमचं सरकार उद्योजकांना प्रोत्साहन देतंय. महाराष्ट्र प्रगतीच्या दिशेने झेप घेतंय. महाराष्ट्राची तुलना कोणत्याही राज्याशी करता येणार नाही, असे प्रतिपादन राज्याचे शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी केले. ते पुढारी न्यूजशी बोलत होते. विधानसभा सुद्धा एकत्र लढवायचं ठरवले आहे, असे केसरकर यांनी म्हटले आहे.

भाजपसोबत गेल्यामुळे कमी जागा लढवाव्या लागत आहे. त्यामुळे नुकसान झाले आहे असे तुम्हाला वाटत नाही का? असे विचारल्यानंतर केसरकर म्हणाले की, काँग्रेससोबत गेल्याने उद्धव ठाकरेंच्या जागा वाढणार आहेत का? काँग्रेस तुम्हाला संपवत आहे. आजपर्यंत प्रादेशिक पक्ष म्हणून शिवसेनेला संपवायचे आणि राष्ट्रवादी मोठी करायची आहे, ही भूमिका अनेकवेळा राहिली आहे. ज्यावेळी शिवसेना आणि भाजपने वेगवेगळी निवडणूक लढवली. शिवसेनेचे भाजपेक्षा कमी आमदार निवडून आले. त्यावेळी उघडपणे पाठिंबा देणारे शरद पवार होते, असेही त्यांनी नमूद केले.

दीपक केसरकर म्हणाले, शिक्षणाचा दर्जा सुधारण्यासाठी आम्ही चांगले निर्णय घेतलेत. कोकणात पर्यटक वाढलेत. महाराष्ट्र विकासात अग्रेसर आहे. कृषी क्षेत्रात महाराष्ट्र आघाडीवर आहे. तरुण देश म्हणून भारताकडे बघितले जात आहे. आम्हाला नरेंद्र मोदींना पुन्हा पंतप्रधान करायचंय. महानंद गुजरातला गेलेलं नाही. इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये महाराष्ट्र एक नंबरवर आहे. येत्या वर्षामध्ये शाळामध्ये बदल झालेला दिसेल. विद्यार्थ्यासाठी सरकार वेगवेगळं उपक्रम राबवतंय. राणे आणि आमच्यातला संघर्ष संपलाय. महाराष्ट्राची तुलना कोणत्याही राज्याशी करता येणार नाही. मुंबईचा विकास फक्त मुख्यमंत्र्यांनी केला. महाराष्ट्रात गुंतवणूक येऊनसुद्धा मुख्यमंत्र्यावर टीका होते.

उद्धव ठाकरे यांना सांगितलं होतं भाजपसोबत राहुया. मलाही मोठमोठ्या ऑफर होत्या, असेही त्यांनी नमूद केले.

पेट्रोल डिझेल दराबाबत केसरकर म्हणाले, आपल्याकडे इन्स्फ्रास्ट्रक्चरकडे होणार खर्च हा पेट्रोलच्या दरातून वसूल केले जातो. राज्य शासनाकडून आपण टोल घेण्याचे बंद केले आहे. विविध राज्यातील पेट्रोल-डिझेलचते दर वेगळी असण्यामागील कारणे वेगळी असू शकतात. शिंदे किती जागांवर लढणार, याबबात माहिती नाही, या प्रश्नावर उत्तर देताना म्हणाले, तुम्ही किती जागा जिंकता, हे महत्त्वाचं ठरतं. आम्हाला कमी जागा मिळणार, हे गृहित धरायचं कारण नाही. जेवढ्या जागा मिळतील, त्या जिंकून आणाव्या लागतील.

मुंबईच्या नावाखाली राजकारण करणं हे बंद झालं. मराठी माणूस १० वर्षे रस्त्यावर होतं. पण आझा त्यांना हक्काची घरं मिळू लागली. मुख्यमंत्री शिंदेंमुळे हे शक्य झालं. मुंबई बदलतेय, आरोग्य सेवा मोफत करण्यात आली आहेत. हे निर्णय मुख्यमंत्री शिंदे यांचे आहेत, असे त्यांनी नमूद केले.

काजूच्या धोरणाला मान्यता आमच्या शासनाने दिेलेली आहे. सर्वात मोठं झुकतं माप कोकणाला दिलले आहे. पर्यटन वाढीसाठी कोकणाला प्राधान्य दिले आहे. कोकणासाठी स्वतंत्र बजेटसाठी वेगळी यंत्रणा उभी केलीय. शिंदे यांच्या नेतृत्वाखाली कोकणचा कायापालट झालेला असणार. युती म्हणून एकत्र विचार आणि काम करावं लागेल. कोकणाची शक्ती बंदरामध्ये आहे. बंदरांचा विकास होऊ लागला आहे. कोकणच्या किनारपट्टीचा विकास व्हावा, असा विचार शिंदे करतात. येत्या काही वर्षात कोकणात संपूर्ण कायापालट होईल.

SCROLL FOR NEXT