Latest

अर्थज्ञान : ईएमआय ‘डीटीआय रेशो’ म्हणजे काय?

दिनेश चोरगे
  • नरेंद्र क्षीरसागर

बहुतांश मंडळी घर किंवा मोटार यांसारखी मोठी खरेदी करण्यासाठी कर्जाची मदत घेतात. या बदल्यात त्यांना दरमहा हप्ता म्हणजेच ईएमआय भरावा लागतो. कालांतराने वाढते घरगुती खर्च पाहता, या मासिक हप्त्याची रक्कम एवढी मोठी वाटू लागते की, लोकांना आर्थिक ताण सहन करावा लागतो.

कर्जाचा हप्ता हा भविष्यातील डोकेदुखी होऊ नये यासाठी उत्पन्नाच्या हिशोबाने किती हप्ता द्यावा हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे. याआधारे अन्य गरजा पूर्ण करणे शक्य राहते. अशा वेळी 'डीटीआय रेशो' कॅ लक्युलेशनची पद्धत खूपच उपयुक्त ठरते.

डीटीआय रेशो म्हणजे काय?

डीटीआय रेशो म्हणजे 'डेट टू इन्कम रेशो' हे कोणतेही कर्ज घेण्यापूर्वी उत्पन्नाच्या हिशोबाने मासिक हप्ता जाणून घेण्याचा मार्ग आहे. 'डीटीआय'च्या माध्यमातून उत्पन्नाचा किती भाग कर्जाच्या हप्त्यापोटी खर्च करू शकतो, हे जाणून घेता येते. मासिक उत्पन्नाच्या किती टक्के हप्त्याची रक्कम ठेवणे उपयुक्त राहील याचे आकलन होण्यास मदत मिळते.

अचूक हप्त्याची आकडेमोड कशी होते?

डीटीआय रेशो हा कर्जाचा हप्ता उत्पन्नाच्या किती प्रमाणात असावा आणि किती राहू शकतो, हे सांगण्याचे काम करतो. एक सामान्य नियमानुसार 'डेट टू इन्कम रेशो' हा 35 ते 40 टक्क्यांपेक्षा अधिक राहू नये, असे म्हटले जाते. उदा. एखाद्या व्यक्तीचे उत्पन्न 30 हजार रुपये असेल तर त्याचा दरमहा हप्ता हा डीटीआय रेशोनुसार 12 हजार रुपयांपेक्षा अधिक असू नये. या गोष्टींचा सारासार विचार करूनच कर्जाची रक्कम आणि कालावधीची निवड करायला हवी.

या गोष्टी लक्षात ठेवा

मोठ्या कालावधीसाठी कर्ज घेताना दोन गोष्टी ध्यानात घेणे महत्त्वाचे. पहिले म्हणजे यासाठी चांगले उत्पन्न असणे गरजेचे आहे आणि दुसरे म्हणजे क्रेडिट स्कोर. एक चांगला क्रेडिट स्कोर हा आपल्याला कोणत्याही बँकांकडून सहजपणे कर्ज मिळवून देण्यास उपयुक्त ठरतो. त्याचबरोबर सिबिल स्कोर चांगला असेल तर व्याजदरात सवलत मिळते.

खर्चाची यादी तयार करा

कोणतेही कर्ज घेण्यापूर्वी दरमहा खर्चाचे आकलन करायला हवे. यासाठी घरभाडे, किराणा, वीज, मोबाईल, गॅसचे बिल, पेट्रोल, वैद्यकीय उपचार, शाळेचे शुल्क आदी गोष्टींचा विचार करायला हवा. यावरून आपण कितपत हप्ता वहन करू शकतो, हे समजण्यास मदत मिळतेे. हप्ता कमी ठेवण्यासाठी कालावधी जास्त ठेवला तर व्याज अधिक जाते. या सर्व गोष्टींचा सारासार विचार करून कर्ज घ्यावे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT