Latest

Deafness : इलाज बहिरेपणावर

अनुराधा कोरवी

जागतिक आरोग्य संघटनेने केलेल्या एका पाहणीत जगातले ३६ कोटी लोक बहिरे होत असल्याचे आढळले आहे. एका पाहणीत ही वस्तुस्थिती आढळून आली. जगातले ३६ कोटी लोक बहिरे होत आहेत आणि बहिरेपणाचे प्रमाण ६५ वर्षे वयाच्या पुढील लोकांमध्ये अधिक प्रमाणात आहे. असे या पाहणीत आढळून आले आहे.

अशा ज्येष्ठ नागरिक असलेल्या बहिऱ्यांच्या संख्या १६ कोटी ५० लाख एवढी आहे. काही लहान मुलांत बहिरेपणाचा दोष आहे. आणि १५ वर्षांच्या आतील बहिऱ्या मुलांची संख्या ३ कोटी २० लाख एवढी आहे. ही संख्या चिंताजनक आहे; परंतु तिच्यावर इलाज आहे. विशेषतः हा इलाज सोपा आहे. काही सोपे इलाज करून व पूर्व काळजी घेऊन यातल्या निम्म्या लोकांना तरी बहिरे होण्यापासून वाचवता येते, असे जागतिक आरोग्य संघटनेचे म्हणणे आहे. मात्र, त्यासाठी बहिरेपणाचे निदान अगदी प्राथमिक अवस्थेत झाले पाहिजे. तसे ते झाल्यास काही लोकांना औषधांच्या सहाय्याने बहिरेपणापासून वाचवता येते.

तर काही लोकांना साधेसाध्या शस्त्रक्रिया करूनसुद्धा या दोषापासून दूर ठेवता येते. काही अविकसित देशातील मुलांमध्ये गोवर, कांजण्या अशा आजारातून बहिरेपणा वाढते, असे आढळले आहे. मात्र याउपरही ज्यांना बहिरेपणापासून वाचवता येत नाही. त्यांना ऐकू येणारी यंत्रे बसवून त्यांच्या या कमतरतेवर मात करता येते.

– डॉ. मनोज कुंभार 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT