Latest

David Warner Retirement : निवृत्तीनंतर डेव्हिड वॉर्नर भावूक; पत्नी कँडिसला म्हणाला, तू माझं जग…

Shambhuraj Pachindre

पुढारी ऑनलाईन डेस्क : ऑस्ट्रेलियाचा स्टार फलंदाज डेव्हिड वॉर्नरने कसोटीमधून निवृत्ती घेतली आहे. त्याने आपल्या कसोटी कारकिर्दीतील शेवटचा सामना पाकिस्तानविरूद्ध खेळला. कारकिर्दीतील शेवटच्या कसोटी डावात त्याने 57 धावा केल्या. तीन सामन्यांच्या मालिकेत ऑस्ट्रेलियाने पाकिस्तानचा 3-0 असा पराभव केला. अखेरच्या कसोटी सामन्यानंतर डेव्हिड वॉर्नर भावूक झाला होता. यावेळी बोलताना त्याने क्रिकेटमधील यशाचे श्रेय पत्नी आणि कुटुंबाला दिले. पत्नी कँडिस व्यतिरिक्त, त्याने भाऊ स्टीव्ह आणि त्याच्या पालकांचे आभार मानले. ज्यांच्या पाठिंब्यामुळे तो ऑस्ट्रेलियासाठी खेळू शकला. (David Warner Retirement)

यावेळी वॉर्नर म्हणाला, 'कुटुंब हा माझ्या जीवनाचा मोठा भाग आहे.' त्यांच्या पाठिंब्याशिवाय तुम्ही काही करू शकत नाही. याचे श्रेय मी माझ्या पालकांना देतो. ज्यांनी माझे उत्कृष्ट संगोपन केले. मी क्रिकेट खेळण्याचे श्रेय माझा भाऊ स्टीव्हला जाते, ज्यांच्या पावलावर पाऊल ठेवून मी आलो. (David Warner Retirement)

यानंतर त्याने आपल्या यशाचे श्रेय पत्नी कॅंडिसला दिले. यावेळी तो म्हणाला, 'कँडिस माझ्या आयुष्यात आली आणि एक प्रकारे तिने मला योग्य मार्गावर आणले. आमचे एक सुंदर कुटुंब आहे आणि मी त्यांच्यासोबत प्रत्येक क्षणाचा आनंद घेतो. मी मरेपर्यंत त्यांच्यावर प्रेम करेन. आणि सध्या मी खूप काही बोलू शकणार नाही कारण मी भावूक होत आहे. पण कँडिस, तू जे केलेस त्याबद्दल धन्यवाद. माझ्यासाठी तू माझे जग आहेस.

डेव्हिड वॉर्नरने 2011 मध्ये कसोटी पदार्पण केले होते. याआधी 2009 मध्ये त्याने वनडे आणि T20 मध्ये पदार्पण केले होते. क्रिकेटदरम्यान त्याने कॅंडिसला डेट करायला सुरुवात केली. यानंतर दोघांनी 2015 मध्ये लग्न केले. डेव्हिडला तीन मुली आहेत – आयव्ही, इंडी आणि इस्ला, असे त्यांचे नाव आहे. ज्यांच्यासोबत वॉर्नर अनेकदा त्याचे व्हिडिओ आणि फोटो इंस्टाग्रामवर शेअर करत असतो. वॉर्नरने कसोटी आणि एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. 2024 च्या सुरुवातीला पत्रकार परिषदेत त्यांने ही माहिती दिली होती. येथे त्याने सांगितले की, त्याला आपल्या कुटुंबासोबत जास्तीत जास्त वेळ घालवायचा आहे.

डेव्हिड वॉर्नरची कारकिर्द

फलंदाज डेव्हिड वॉर्नरने आपल्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत 112 कसोटी आणि 161 एकदिवसीय सामने खेळले. कसोटी क्रिकेटमध्ये त्याच्या नावावर 8786 धावा आहेत, ज्यामध्ये त्याने 26 शतके आणि 37 अर्धशतके झळकावली आहेत. वनडे फॉरमॅटमध्ये त्याने 22 शतके आणि 33 अर्धशतकांच्या मदतीने 6932 धावा केल्या. त्याने आतापर्यंत 99 टी-20 सामने खेळले आहेत आणि या फॉरमॅटमध्ये त्याच्या नावावर 2894 धावा आहेत. या फॉरमॅटमध्येही त्याच्या नावावर एक शतक आणि 24 अर्धशतके आहेत.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT