Latest

Cyclone Freddy: फ्रेडी चक्रीवादळाचा कहर; दक्षिणपूर्व आफ्रिकेत ३०० हून अधिक लोकांचा मृत्यू

निलेश पोतदार

पुढारी ऑनलाईन : फ्रेडी चक्रीवादळामुळे दक्षिणपूर्व आफ्रिकेत 300 हून अधिक लोकांचा मृत्यू झाल्‍याचे समोर आले आहे. मलावीच्या आपत्ती व्यवस्थापन खात्याने सांगितलेल्‍या माहितीनुसार, चक्रीवादळामुळे आतापर्यंत 326 लोकांचा मृत्यू झाला आहे. या उष्णकटिबंधीय वादळामुळे झालेल्या या विध्वंसात वाचलेले लोकही अजुन अनेक ठिकाणी अडकले आहेत.

बचाव पथकातील अधिकार्‍यांनी सांगितले की, चक्रीवादळातील फटका बसलेल्‍या अनेक क्षेत्रांपैकी एक असलेलया चिलोब्‍वे मध्ये ३० हून अधिक लोकांचा मृत्‍यू झाला. तर शेकडो लोक अजुनही बेपत्‍ता आहेत. बेपत्‍ता लोकांना शोधण्यासाठी कोसळलेल्‍या घरांच्या ढिगाऱ्यांच्या अवशेषांखाली लोकांचा शोध घेतला जात आहे. अनेक लोक आपल्‍या स्‍वकियांच्या शोधासाठी अवशेषांच्या ढिगाऱ्यावर हातता फावडा घेवून शोध मोहिमेत सहभागी झाल्‍याचे दिसून येत आहे.

हवामान विभागाने दिलेल्‍या अहवालात वादळासह मुसळधार पावसाचा ईशारा देण्यात आला आहे. याआधी मंगळवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी फ्रेडी चक्रीवादळात मृत्‍युमुखी पडलेल्‍या लोकांविषयी शोक व्यक्‍त केला. त्‍यांनी म्‍हटलंय की, भारत या नैसर्गिक संकटात सापडलेल्‍या देशांतील लोकांच्या पाठिशी आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT