Latest

Cristiano Ronaldo : पॅलेस्टाईनचे समर्थन केल्याने रोनाल्डो ठरला राजकीय बळी; तुर्कीच्या राष्ट्राध्यक्षांचे विधान

Shambhuraj Pachindre

पुढारी ऑनलाईन डेस्क : FIFA विश्वचषक स्पर्धेदरम्यान पोर्तुगालचे प्रशिक्षक फर्नांडो सँटोस यांनी नॉकआऊट फेरीतील महत्वाच्या सामन्यांत रोनाल्डोला बेंचवर बसवले होते. त्याची जागी युवा खेळाडू गोन्झालो रोमोसला मैदानात उतरवण्यात आले. या संधीचा फायदा घेत त्याने उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात त्याने तीन गोल करूत संघाच्या विजयात महत्वाची कामगिरी बजावली होती. त्यानंतरही असेच पहायला मिळाले. मोरोक्कोविरूध्दच्या सामन्यात रोनाल्डो (Cristiano Ronaldo) संघाचा भाग नव्हता. शेवटची ३० मिनिट शिल्लक असताना त्याला मैदानात उतरवण्यात आले. पण तो मोरोक्को विरूध्दच्या सामन्यात अनेक चढाया रचून देखील संघाला विजयी करण्यात अपयशी ठरला.

जगातील महान फुटबॉलपटूंपैकी एक असलेल्या रोनाल्डोला एका महत्त्वपूर्ण सामन्यात बेंचवर बसवल्याने पोर्तुगालचे प्रशिक्षक सँटोस यांच्यावर टीका झाली होती. रोनाल्डोची गर्लफ्रेंड जॉर्जिना हिनेही याबद्दल संताप व्यक्त केला होता. आता याप्रकरणी तुर्कीचे राष्ट्राध्यक्ष रेसेप तय्यप एर्दोगन यांनी नवा खुलासा केला आहे. राजकारणाचा बळी ठरला असल्याचे विधान करून त्यांनी एकच खळबळ उडवून दिली आहे. (Cristiano Ronaldo)

कतारमध्ये झालेल्या विश्वचषकादरम्यान रोनाल्डोचा कमी वापर करण्यात आला होता. त्यामुळे पोर्तुगालला विश्वचषक स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत मोरोक्कोकडून पराभूत व्हावे लागले होते. असे एर्दोगानयांनी म्हटले. त्या सामन्यात पोर्तुगालचा १-० ने पराभव झाला होता. तर स्वित्झर्लंडविरुद्धच्या सामन्यातही रोनाल्डोला बेंचवर बसवण्यात आले होते.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, रविवारी एका कार्यक्रमात बोलताना एर्दोगन म्हणाले, "रोनाल्डो हा पॅलेस्टिनी समर्थक आहे. त्यामुळेच त्याला उद्ध्वस्त करण्यात आले आहे,' असा आरोप त्यांनी केला आहे.

हेही वाचा;

SCROLL FOR NEXT