Latest

Crime News : महिलेचा तालिबानी पद्धतीने छळ, खांबाला बांधून काठीने बेदम मारहाण अन्…

backup backup

पुढारी ऑनलाइन डेस्क : Crime News : पतीच्या मृत्यूनंतर दुसरे लग्न केले म्हणून महिलेचा तालिबानी पद्धतीने छळ करण्यात आला. माजी सासरच्यांकडून महिलेला खांबाला बांधून काठीने बेदम मारहाण करण्यात आली. नंतर तीचे मुंडन करण्यात आले. ही अमानवीय घटना गुजरातमधील अमरेली जिल्ह्यात बाबरा तालुक्यातील गडकोटडी गावात घडली. याप्रकरणी पोलिसांनी दोन महिलांना अटक केली आहे तर अन्य तीन जण फरार आहेत.

Crime News : अमरेली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 35 वर्षीय पीडिता ही गडकोटडीतील होती. तिला तिच्या पतीपासून चार मुले आहेत. तिच्या पतीच्या निधनानंतर चार वर्षांनी तिने जसदण तालुक्यातील दुस-या गावातील एका व्यक्तीशी पुन्हा कोर्टात लग्न केले. सोमवारी रात्री पीडिता ही तिच्या माजी पतीच्या घरी जुन्या पतीपासून असलेल्या चार पैकी एकाची काळजी घेण्यासाठी मदत करता येईल का? या उद्देशाने पूर्व सासरच्यांना भेट दिली. मात्र, जेव्हा ती घरात गेली तेव्हा आरोपी सोनल, घाघू आणि तिचा पती हिरजी आणि कमला यांना राग आहे. त्यांनी तिला पुन्हा लग्न केल्याबद्दल शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. एवढ्यावरच न थांबता चौघांनी तिला बाहेर ओढत नेले. खांबाभोवती जबरदस्तीने धरले आणि काठीने मारहाण केली. त्यानंतर त्यांनी तिचे मुंडन केले.

Crime News : दरम्यान, हे सर्व घडत असताना आजूबाजूला लोक जमा झाले त्यांच्यापैकी एकाने पोलिसांना माहिती दिली. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पीडितेची सुटका केली.

पोलिसांनी आरोपी घाघू खटाना, पीडितेची मोठी मेहुणी आणि सोनल वाघेला नावाच्या आणखी एका महिलेला अटक केली. तर अन्य दोन आरोपी फरार आहेत. पोलिस त्यांचा शोध घेत आहेत.

Crime News : दरम्यान, पीडितेला मारहाण करतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या घटनेचा सर्व स्तरातून निषेध होत आहे.

हे ही वाचा :

SCROLL FOR NEXT