Latest

Kedar Jadhav : अखेर क्रिकेटपटू केदार जाधवचे वडिल सापडले

अमृता चौगुले

पुणे; पुढारी वृत्तसेवा : भारतीय संघासाठी खेळणारा क्रिकेटपटू केदार याचे वडिल महादेव सोपान जाधव अखेर मुंढवा पोलिस स्टेशनजवळ सापडले आहेत. केदार जाधव याचे वडिल महादेव सोपान जाधव (75, रा. प्लॅट नं. 002, बी विंग, द पॅलेडियमन, सिटी प्राईडजवळ, कोथरूड) हे कोथरुड भागातून बेपत्ता झाले होते. याबाबत पुण्याच्या अलंकार पोलिस ठाण्यात मिसिंगची तक्रार दाखल केली होती. दिवसभर शहर पोलिस दलातील पाच पथकाकडून तपासण घेण्यात येत होता.

केदार जाधव हे त्यांच्या कुटुंबियासह पुण्यातील कोथरूड परिसरात रहावयास आहेत. त्यांचे वडिल महादेव जाधव यांना डिमेंशिया हा आजार आहे. त्यामुळे त्यांना बर्‍याचशा गोष्टी लक्षात रहात नाहीत. आजारपणामुळे ते नेहमीच घरी असतात. जाधव कुटुंबिय हे त्यांना घराबाहेर पाठवत नाहीत. दरम्यान, आज (दि. 27 मार्च) रोजी दुपारी बावणे बारा वाजण्याच्या सुमारास महादेव जाधव हे फिरण्यासाठी त्यांच्या घराखालील मेन गेटजवळ गेले होते.

तेथे काही वेळ चकरा मारल्यानंतर आऊट गेटने ते बिल्डींगमधून बाहेर पडून कोठेतरी निघुन गेले आहेत. कुटुंबियांनी त्यांचा शोध घेतला मात्र ते मिळुन न आल्याने त्यांनी अलंकार पोलिस ठाण्यात मिसिंगची तक्रार दिली होती. माध्यमातून ही बातमी पसरल्यानंतर पोलिसांच्या पाच पथकांनी शोध मोहिम सुरु केली. अखेर रात्री उशिरा मुंढवा येथे शोध लागला.

SCROLL FOR NEXT