Latest

क्रिकेटपटू केदार जाधवचे वडील पुण्यातून बेपत्ता, पोलिसांत तक्रार दाखल

अमृता चौगुले

पुढारी ऑनलाईन: भारतीय क्रिकेट संघासाठी अष्टपैलू भूमिका निभावलेला खेळाडू केदार जाधवचे वडील महादेव सोपान जाधव (75, रा. प्लॅट नं. 002, बी विंग, द पॅलेडियमन, सिटी प्राईडजवळ, कोथरूड) हे पुण्यातून बेपत्ता झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. याबाबत पुण्याच्या अलंकार पोलिस ठाण्यात मिसिंगची तक्रार दाखल आहे. पोलिस त्यांचा शोध घेत आहेत.

केदार जाधव हे त्यांच्या कुटुंबियासह पुण्यातील कोथरूड परिसरात रहावयास आहेत. त्याचे वडील महादेव जाधव यांना डिमेंशिया हा आजार आहे. त्यामुळे त्यांना बर्‍याचशा गोष्टी लक्षात रहात नाहीत. आजारपणामुळे ते नेहमीच घरी असतात. जाधव कुटुंबिय हे त्यांना घराबाहेर पाठवत नाहीत. दरम्यान, आज (दि. 27 मार्च) रोजी दुपारी बावणे बारा वाजण्याच्या सुमारास महादेव जाधव हे फिरण्यासाठी त्यांच्या घराखालील मेन गेटजवळ गेले होते. तेथे काही वेळ चकरा मारल्यानंतर आऊट गेटने ते बिल्डींगमधून बाहेर पडून कोठेतरी निघुन गेले आहेत. कुटुंबियांनी त्यांचा शोध घेतला मात्र ते मिळुन न आल्याने त्यांनी अलंकार पोलिस ठाण्यात मिसिंगची तक्रार दिली आहे.

महादेव जाधव यांचा रंग-गोरा, केस-पांढरे, उंची-5.6, डाव्या गालावर शस्त्रक्रिया झाल्याने खड्डा पडलेला आहे. महादेव जाधव यांच्या अंगात फुल्ल बाहीचा र्शट व ग्रे कलरची पॅन्ट व पायात काळी चप्पल आणि सॉक्स आहेत. उजव्या हाताचे बोटात दोन सोन्याच्या अंगठया आहेत.

दरम्यान, महादेव जाधव यांच्याबाबत काही माहिती मिळाल्यास संबंधितांनी अलंकार पोलिस ठाण्याशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.

SCROLL FOR NEXT