Latest

Jaiswal vs Tendulkar : 26 षटकार ठोकून यशस्वी जैस्वालने सचिन तेंडुलकरला टाकले मागे!

रणजित गायकवाड

पुढारी ऑनलाईन डेस्क : Jaiswal vs Tendulkar : इंग्लंडविरुद्ध सुरू असलेल्या कसोटी मालिकेत युवा सलामीवीर यशस्वी जैस्वाल शानदार फॉर्ममध्ये आहे. गुरुवारी, पाचव्या कसोटीच्या पहिल्या दिवशी त्याने 57 धावांची दमदार खेळी केली. आपल्या खेळीदरम्यान, त्याने एकाच षटकात तीन षटकार ठोकले. याचबरोबर त्याने कसोटीत एका संघाविरुद्ध सर्वाधिक षटकार मारण्याच्या बाबतीत भारताचा माजी दिग्गज फलंदाज सचिन तेंडुलकरला मागे टाकले आहे.

जैस्वाल कसोटीत एका संघाविरुद्ध सर्वाधिक षटकार मारणारा भारतीय फलंदाज ठरला आहे. इंग्लंडविरुद्ध सुरू असलेल्या कसोटी मालिकेत त्याने आतापर्यंत 26 षटकार मारले आहेत. यापूर्वी हा विक्रम सचिन तेंडुलकरच्या नावावर होता. त्याने ऑस्ट्रेलियाविरुद्ध 25 षटकार मारले होते. या यादीत तिसऱ्या क्रमांकावर रोहित शर्मा (22 षटकार वि. द. आफ्रिका) आहे. तर चौथ्या क्रमांकावर कपिल देव (21 षटकार वि. इंग्लंड) आणि ऋषभ पंत (21 षटकार वि. इंग्लंड)आहेत. (Jaiswal vs Tendulkar)

कसोटीत एका संघाविरुद्ध सर्वाधिक षटकार ठोकणारे भारतीय फलंदाज

26 षटकार : यशस्वी जैस्वाल विरुद्ध इंग्लंड
25 षटकार : सचिन तेंडुलकर विरुद्ध ऑस्ट्रेलिया
22 षटकार : रोहित शर्मा विरुद्ध दक्षिण आफ्रिका
21 षटकार : कपिल देव विरुद्ध इंग्लंड
21 षटकार : ऋषभ पंत विरुद्ध इंग्लंड

भारतासाठी कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम सुनील गावस्कर यांच्या नावावर आहे. सुनील गावस्कर यांनी 1971 मध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध 774 धावा केल्या होत्या. या यादीत गावसकरांचीच धावसंख्या आहे. त्यांनी 1978-79 मध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध घरच्या मैदानावर 732 धावा केल्या होत्या. या यादीत यशस्वी जैस्वाल तिसऱ्या स्थानावर पोहोचला आहे. त्याच्या नावावर 712 धावा जमा झाल्या आहेत. त्याने इंग्लंडविरुद्ध ही कामगिरी केली आहे. विराट कोहलीने ऑस्ट्रेलियाविरुद्ध 692 धावा केल्या होत्या. (Jaiswal vs Tendulkar)

भारतासाठी कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा करणारे फलंदाज

774 : सुनील गावसकर विरुद्ध वेस्ट इंडिज, 1971
732 : सुनील गावसकर विरुद्ध वेस्ट इंडिज, 1978/79
712* : यशस्वी जैस्वाल विरुद्ध इंग्लंड, 2024
692 : विराट कोहली विरुद्ध ऑस्ट्रेलिया, 2014/15
655 : विराट कोहली विरुद्ध इंग्लंड, 2016

SCROLL FOR NEXT